आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​राजकीय आरक्षण:नगर पालिकेत काही राजकीय वजनदार नेते येणार समोरासमोर, तर अनेकांना मात्र पेच

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मूर्तजिापूर व बाळापूर या चार नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षणाची प्रक्रिया सोमवारी झाली. एकूण १०२ प्रभागांसाठी १०५ जागांसाठी आरक्षण निश्चित केले. अनेक ठिकाणी दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. काहींचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना एक तर कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागेल किंवा स्वत:च्या सोयीच्या प्रभागातून लढण्यासाठी फिल्डींग लावावी लागणार आहे. जिल्ह्यातील अकोट, मूर्तजिापूर, बाळापूर व तेल्हारा नगर परिषदेची मुदत जानेवारीत संपल्याने प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चारही न.प.च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षणाची प्रक्रिया राबवली. १३ जूनला संबंधित न.प.च्या सभागृहात प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया झाली. पातूरची प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे.

सन २०१७ मध्ये झालेल्या न.प.निवडणुकीत जिल्ह्यातील अकोट, मूर्तजिापूर, तेल्हारा न.प.मध्ये भाजपचे कमळ फुलले होते. याठकाणचे नगराध्यक्ष भाजपचे होते. पातूर, बाळापूर न.प. चे अध्यक्षपद काँग्रेस नेत्यांकडे होते. बार्शीटाकळी नगर पंचायतीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आाहे. न.प.मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे अस्तित्व भाजपच्या तुलनेने कमी आहे. बाळापूर। न.प.त अनेक दिग्गजांना सोयीच्या प्रभागासाठी फिल्डींग लावावी लागणार असल्याचे प्रभागनिहाय आरक्षणानंतर दिसले. न.प.वर चार पेक्षा जास्त दशकांपासून अॅड. खतिब कुटुंबांची सत्ता आहे. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील महिला प्रभाग ६ मधून नगरसेविका झाली होती. मात्र वीन प्रभागात काही भाग नव्याने समाविष्ट झाला असून, ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली. त्यामुळे त्यांना अन्य सोयीच्या जागेवरून लढावे लागण्याची शक्यता आहे. न.प.निवडणुकीत येथे परिवर्तन पॅनल व नगर विकास आघाडी या दोघांमध्ये सामना रंगत असतो.कुटुबांतील महिलांना द्यावी लागणार संधी, काहींना घ्यावा लागणार अन्य जागेचा शोध बड्या नेत्यांसाठी सोयीची रचना मूर्तजिापूर येथे अनेक दिग्गजांची सोय दिग्गजांना करावी लागणार शोधा आहे.

न.प.च्या निवडणुकीत माजी नगराध्यक्षांना स्वत:चे राजकीय वलय असलेल्या ठिकाणीच लढण्याची संधी मिळणार असल्याने प्रभागनिहाय आरक्षणावरुन दिसते. माजी नगराध्यक्ष भाजपचे हरनिारायण माकोडे हे प्रभाग ४ मध्ये राहतात. याच परिसरात काँग्रेसचे नेते, माजी नगराध्यक्ष संजय माकोडे यांचे वास्तव्य आहे. प्रभाग ४ ची एक जागा सर्वसाधारणसाठी निघाली. शिवसेनेचे दिलीप बाेचे यांचा प्रभाग १० मधील परिसरातून वजिया बोचे नगरगेविका म्हणून वजियी झाल्या होत्या. प्रभाग १० मधील एक जागा सर्वसाधारण, दुसरी जागा सर्वसधारण स्त्रीसाठी राखीव आहे. दिग्गजांना सोयीच्या ठिकाणाहून लढण्याची संधी मिळाली आहे. मूर्तजिापूर। न.प.त माजी नगराध्यक्षांसह अनेक दिग्गजांना सोयीच्या ठिकाणी संधी मिळणार असल्याचे आरक्षण प्रक्रियेवरुन दिसते. न.प.च्या यापूर्वीच्या निवडणुकीत सर्वाधिक ८ जागा भाजपने जिंकल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी व शिवसेना होती. शहरासह तालुक्यात अनेक वर्षांपासून विधानसभेत भाजपचा वजिय झाल्याने शहरात राजकीय पकड असली तरी गत वेळी राकाँ व वंचित बहुजन आघाडीनेही चांगली लढत दिली होती. त्यामुळे यंदा न.प.ची निवडणूक भाजपसाठी सोयीची नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. माजी नगराध्यासह अनेक जण सोयीच्या ठिकाणीहून लढणार असल्याचे प्रभाग आरक्षणावर नजर टाकल्यास दिसते. तेल्हारा। काही दिग्गांचे प्रभाग सुरक्षित असल्याचे दिसते. माजी नगराध्यक्षा जयश्री पुंडकर राहत असलेल्या प्रभाग ८ ची एक जागा सर्व साधारणसाठी राखीव असून, माजी नगराध्यक्षा कान्होपात्रा फाटकर या राहत असलेल्या प्रभाग ७ ची एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली. माजी नगराध्यक्ष दयालसिंह बलोदे राहत असलेला प्रभाग ६ ची एक जागा सर्वसाधारण महिला, दुसरी जागा सर्व साधारणसाठी जाहीर केली. काँग्रेसच्या डॉ. संजीवनी बिहाडे, भाजपच्या नयना मनतकार, राकाँच्या मनीषा देशमुख, विक्की मल यांचा कस लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...