आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यातील दुर्दैवी घटना:म्हशीचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोन मुलीसह आईचा धरणात बडून मृत्यू

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणाच्या पाण्यात बुडून आईसह दोन अल्पवयीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील दगडपारवा येथे घडली आहे. धरणातून वाहत असलेल्या सांडव्यात त्यांचे मृतदेह सोमवारी पहाटे दिसून आले. हरवलेल्या म्हशीच्या शोधात त्या धरणाकडे गेल्या होत्या

सरिता सुरेश घोगरे (वय 40, राहणार दगडपारवा, ता. बार्शीटाकळी जि. अकोला) असे आईचे नाव आहे. तर मोठ्या मुलीचे नाव अंजली (वय 16) आणि दुसऱ्या लहान मुलीच नाव वैशाली (वय 14) असे आहे. या तिघी रविवारी धरणाच्या परिसरात म्हशीचा शोध घेत होत्या. म्हैश हरवली म्हणून या मायलेकी म्हशीच्या शोधात होत्या.

म्हशीला शोधण्यासाठी मुलगी आधी पाण्यात उतरली पण मुलीला बुडतांना पाहून तिच्या आईने देखील पाण्यात ऊडी मारली आणि दोघींना पोहता येत नसल्याने त्यांना आपली जीव गमवावा लागला. दरम्यान रविवारी संध्याकाळी तिघीही घरी आल्याने सुरेश घोगरे यांनी बार्शीटाळकी पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिला. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गावकऱ्यांना धरणाच्या सांडवाच्या पाण्यात या तिघांचे मृतदेह दिसून आल्याने एकच गर्दी झाली. यासंदर्भात पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळ गाठले. आणि बचाव पथकासह गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवले गेले आहे. एकाच शेतकरी कुटुंबातील मायलेकी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...