आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंजू ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट जनतेतून महानाम भानुदास फुलके हे विजयी झाले. तर मंगळवारी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उषाताई होनाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १८ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार महानाम भानुदास फुलके हे बहुमताने निवडून आले असल्याने त्याचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी ६ जानेवारीला झाला.
शुक्रवारी त्याच्याच पॅनलच्या उषा गोपाल होनाळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा संतोष उके, आनंद दिनकर अंभोरे, कांताबाई विष्णु चव्हाण, सुरेश बलभीम अंभोरे उपस्थित होत्या. सर्वच उमेदवार बहुमताने निवडून आले. सोनाळा येथे या सर्वांच्या पदग्रहण समारंभप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी संजय तायडे व ग्रामविकास अधिकारी म्हणून घायवट यांनी काम पाहिले . या वेळी ‘वंचित’चे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.