आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन:विकृतीला नष्ट करण्यासाठी रामदेवबाबा यांचा अवतार ; आचार्य श्यामदेव शास्त्री

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विकृतीला समुळ नष्ट करण्यासाठी रामदेवबाबा यांचे अवतार कार्य झाले आहे. याच दृष्टीने त्यांनी भैरव नामक राक्षसाचा आतंक नष्ट करून समाजाला मुक्ती दिली आहे. हा दृष्टांत त्यांच्या जगत कल्याणाचा परिचायक आहे,’ असा हितोपदेश पु. आचार्य श्यामदेव शास्त्री यांनी केला. स्थानिय गीता नगर येथील रामदेवबाबा शामबाबा मंदिरात सुरू असलेल्या आचार्य श्यामदेव शास्त्री याच्या रामदेवबाबा कथेचे पंचम पुष्प गुंफताना त्यांनी रामदेवबाबाच्या बाल लिलांची महती सांगितली. त्यांचे पिता महाराज अजमलजी, माता मैनादे, मोठा बिरमदेव, बहिणी सगुना व लाछा त्यांचे कुटुंब होते.भगवान रामदेवबाबा यांनी आपल्या बाल लिलेत माता मैनादेला जिवंत दृष्टांत देत दृष्टांताची सुरुवात केली. आपल्या पाच वर्षीय वयात बालक रामदेवबाबा यांनी घोड्याला वेसण घातले. हे सर्व त्यांनी भक्तांच्या उद्धारासाठी केले असल्याचे सांगून सत्राच्या उत्तरार्धात त्यांनी भैरव राक्षसाची गाथा प्रतिपादित केली. राक्षसत्व व देवत्व हा कर्माचा परिपाक आहे. कर्माने कुणी राक्षसी व कुणी दैवी गुणांचा होतो. जो सद्गुणी आहे, तो देव आहे व जो अनैतिक व दृष्ट कार्य करणारा आहे तो राक्षस आहे.

साधारण असणारा भैरवनाथ आपल्या अनैतिक व दृष्ट गुणांनी भैरव राक्षस बनला. त्याचा संहार सात वर्षीय बालक रामदेव बाबा यांनी करून त्याला शापातून मुक्त केले. हा उद्धार रामदेव बाबा यांनी आपल्या गुरुदेवांच्या कृपेने केला. म्हणून सद्गुरु हे सदा जीवन पथप्रदर्शक असतात. भगवंत प्राप्तीसाठी सद्गुरुचे असणे गरजेचे असल्याचे त्यांनी या सत्रात सांगून आरतीने या सत्राचे समापन करण्यात आले. कथेत जुम्मा गायक विक्की ब्यावत यांच्या संगीतमय भजनांचा जल्लोष सुरू असून, कथेत विमला खोजा, बालक श्याम खोजा व बालिका खुशी यांनी अद्भुत नृत्य करून भक्तीभाव निर्माण केला. सत्राचा प्रारंभ मुख्य यजमान नेहा पल्सचे संतोष नथमल गोयनका, पुष्पा गोयनका, तुषार गोयनका यांच्या पूजाविधीने झाला. पं. प्रतापदास शास्त्री व वर्धा येथील भक्त कोठारी यांच्या सानिध्यात सुरू असलेल्या कथेत पं दीक्षित व राघव यांनी आरती केली. ५ सप्टेंबर पर्यंत नित्य दुपारी ३ ते सायंकाळ ६ पर्यंत आयोजित या अद्भुत कथेचा भक्तांनी लाभ घेण्याचे आवाह रामदेवबाबा-शामबाबा सेवा समितीने केले.

बातम्या आणखी आहेत...