आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथे सराफा व्यावसायिकास मारहाण करून दुकानामधील 25 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांची भरलेली बॅग घेऊन संशयित आरोपी मामा आणि भाच्याने पळ काढला. ही घटना अडसूळ येथे 27 जुलै रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणातील एकास गुरुवारी अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीला शुक्रवारी 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. तर अद्याप घटनेतील एक संशयित पसार आहे.
काय आहे नेमके प्रकरण
जुगलकिशोर रानुलाल वर्मा (रा. तेल्हारा) यांचे अडसूळ येथे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. ते दुकानात असताना संशयित नितीन गजानन अमझरे (रा. अडसळ) हा हातात लोखंडी पाईप घेऊन व श्रीकृष्ण सुभाष नांदने (रा. काकणवाडा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) हा हातात कोयता घेऊन हे दोघे मामा-भाचे दुकानात आले.
नितीन अमझरे याने फिर्यादीस तू माझी घेतलेली चारचाकी गाडी परत दे म्हणून शिवीगाळ केली व लोखंडी पाईपने मारहाण केली. यावेळी त्यांनी सराफा व्यावसायिकाच्या दुकानांतील विविध दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. आरोपी नितीन अमझरे याने फिर्यादी जुगलकिशोर वर्मा यांना पकडून घरी नेले व फिर्यादीच्या खिशातील गाडीची चावी काढून घेतली.
दुकानातील दागिण्याची बँग पळवली
दरम्यान दोन्ही संशयित आरोपींच्या प्रकरणात सोन्याची 548 ग्रॅमची वेगवेगळ्या प्रकारची भरलेली बॅगबाजार किंमत 25 लाख 75 हजार 600 रुपये घेऊन पळून गेले. या प्रकरणी संशयितांवर पोलिसांनी कलम 394, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
मुख्य संशयित पसार
पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण सुभाष नांदने यास अटक केली वन्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन अमझरे हा फरार आहे. ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कायंदे पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.