आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएचसीतील 36 दांडीबद्दारांची वेतनवाढ राेखली:14 डाॅक्टरांचाही समावेश; 'स्थायी'च्या सभेत मुद्दा गाजला

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) आढळून आलेल्या बेताल कारभारप्रकरणी 36 जणांची वेतनवाढ राेखण्यात आली असून, यात 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याबाबतची मािहती शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पथकांनी केलेल्या पाहणीत तीन ठिकाणी कुलूप तर काही ठिकाणी डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले हाेते. बंद आढळून आलेल्या तीन प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस बाजवण्यात आली हाेती. त्यांच्याकडून खुलासेही मागविण्यात आले हाेते. दरम्यान याप्रकरणी कार्यवाही हाेत असल्याची मािहती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसाेले यांनी शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत दिली.

यांच्यावर कार्यवाही

तपासणीदरम्यान गैरहजर आढळलेल्या 14 वैद्यकीय अधिकारी (नियमित) यांच्यावर कारवाई करण्यात आली. संबंधितांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असमाधानकारक कार्यकाळ असल्याने त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

तीन स्वास्थ अभ्यंगता (एचव्ही), एक आरोग्य सेविका, सहा सफाई कामगार आणि एक वाहन चालक (नियमित) यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

11 कंत्राटी स्टाफ नर्स यांची वेतनवाढ पाच टक्क्यांनी रोखण्याचा आदेश देण्यात आला आहे.

‘ताे’ डाॅक्टर बाेगसच; एमओंवरही कार्यवाही हवी

कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेला डाॅक्टर बाेगस हाेता. संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुरेश असाेले यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली.

बाेगस व्यक्तिला उपचारासाठी बसविणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर म्हणाले. संबंधित एमओंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे सदस्य डाॅ. प्रशांत आढऊ यांनी केली. मुख्य आराेपी तर संबंधित एमओंनाच करा, असे काॅग्रेसचे सदस्य चंद्रशेखर चिंचाेळकर म्हणाले.

काय आढळले हाेते?

बार्शीटाकळी तालुक्यातील पीएससीमध्ये कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. पातूर तालुक्यातील पीएचीसींमध्ये 18 पैकी एकच कंत्राटी हजर असल्याचे आढळून आला. काही िठकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य हाेते. छतावरून पाणीही गळत असल्याचे दिसून आले. आगार परिसरातील ग्रामस्थांशी पथकाने आराेग्य सुविधांबाबत संवाद साधला हाेता. यातून अनेक आढळून आल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...