आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलि्ह्यात धार्मिक स्थळांच्या वैधतेची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यादृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला जलि्ह्यात धार्मिक स्थळांवर १ हजार ३१८ भोंगे लावण्यात आले आहेत. हे सर्वच धार्मिक स्थळांवरचे भोंगे अनधिकृत आहे.
जलि्ह्यात केवळ अकोट येथील देवी मंदिरावरील भोंग्याची एकच परवानगी यापूर्वीच घेण्यात आली आहे. मशदिीवरील भोंग्यांपासून सुरू झालेले राजकारणाचा सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यापर्यंत येऊन ठेपले असल्याने किती भोंगे अधिकृत आणि किती अनधिकृत याची तपासणी पोलिस करताहेत. भोंग्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर काही धार्मिक स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्या अनुषंगाने जलि्ह्यात सर्व धर्मीय धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी एक हजार ३१८ भोंगे लावण्यात आलेले असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये लहान मोठ्या मंदिरावर ४४६, मशीद, दर्ग्यावर ६३३, बुद्ध विहारावर १४०, चर्च व गुरुद्वारावर प्रत्येकी एक, इतर धार्मिक स्थळांवर तीन असे एकूण एक हजार ३१८ भोंगे लावलेले आहेत. यातील कोणत्याही धार्मिक स्थळांवरील भोंगे हे अधिकृत नाहीत. जलि्ह्यात केवळ अकोट येथील देवी मंदिरावरील एकमेव भोंग्याची परवानगी घेण्यात आल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. गुरुवारी अकोल्यातील पहलि्या मशदिीवरील भोंग्याला परवानगी : भोंगे लावण्याबाबत रितसर परवानगी घेण्याचे अर्ज धार्मिक स्थळांकडून करण्यात आले होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अकोला शहरातील कच्छी मशदिीला भोंगे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी अकोला जलि्ह्यात दलिेली ही पहलिीच परवानगी ठरली आहे.
विशेष म्हणजे २०१६ मध्ये कच्छी मस्जदि ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकेरिया यांनी परवानगीसाठी अर्जही केला होता. सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी गुरुवारी परवानगी पत्र दलिे. परवानगी मिळविण्यासाठी ॲड. मोहम्मद परवेज, ॲड. इलीयास शेखानी, कच्छी मस्जदि ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकारिया, मुतवल्ली अजाज सूर्या, नायब मुतवल्ली हाजी यासीन बच्चाव, सदस्य हाजी हनीफ मलक, हाजी फारूक भुरानी, कच्छी मेमन जमातचे सचवि हाजी सलीम गाझी उपस्थित होते. परवानगीनुसार सकाळी ६, दुपारी १.३०, ४.३० सायंकाळी ६.३० आणि रात्री ८.३० असे पाच वेळा अजान पुकारण्यासाठी कायदेशीर परवानगी राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.