आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:वातावरण बदलाने सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणात वाढलेला गारवा आणि‎ सततच्या वातावरण बदलामुळे सर्दी,‎ खोकल्यासह व्हायरल फिवरचे रुग्ण‎ आढळून येत आहेत. खासगी दवाखाने‎ आणि रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण‎ विभागात सुमारे १२ ते १५ टक्के रुग्ण हे‎ सर्दी, ताप, खोकल्यावर उपचार‎ घेण्यासाठी येत असल्याचे डॉक्टर‎ सांगतात.‎ गेल्या महिनाभरात जिल्ह्यात‎ सातत्याने वातावरणात बदल झाला‎ आहे. तापमानात अचानक मोठी‎ घसरण किंवा मोठी वाढ, ढगाळ‎ वातावरण, उकाडा तर तीन‎ दिवसांपासून सकाळी ११ वाजेपर्यंत‎ राहणारा गारवा यामुळे सर्दी, खोकला,‎ व्हायरल फिवरचे रुग्ण आढळून येत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहेत.

लहानग्यांसह मोठ्यांनाही‎ वारंवार बदलणाऱ्या वातावरणाचा त्रास‎ सहन करावा लागत आहे. पाच‎ वर्षाआतील बालकांना वारंवार‎ सर्दी-खोकला होत असून कफ दाटून‎ येत असल्याने श्वसनाशी संबंधित‎ तक्रारी बालकांमध्ये वाढल्या आहेत.‎ बालकांची काळजी घ्या :‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सध्याच्या थंड वातावरणात लहान‎ मुलांना बाहेर फिरवू नका. एका वर्षाच्या‎ आतील मुलांना पूर्ण अंगाला गरम‎ कपड्याने संरक्षण द्या.‎ - शक्यतो सकाळी आणि रात्री‎ दुचाकीवरून प्रवास टाळा. मुले‎ आजारी असल्यास शाळेत पाठवू नका.‎ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्या.

‎​​​​​​​दीर्घकाळ सर्दी‎
वातावरणातील बदलामुळे लहान‎ मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापाची लक्षणे‎ दिसून येत आहेत. मुलांना दीर्घकाळ सर्दी‎ आणि कफ राहत आहे. थंड‎ वातावरणापासून लहानग्यांना जपावे.‎ लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ल्याने‎ उपचार घ्यावा.‎ - डॉ. विजय चव्हाण, बालरोगतज्ज्ञ‎

२.७ अंशाने घसरले तापमान‎
जिल्ह्यातील वातावरणात गुरुवारी‎ अचानक बदल झाला असून, किमान‎ तापमानात २.७ अंश सेल्सियसने घट‎ झाली आहे. बुधवारी किमान तापमान‎ १६.३ अंश सेल्सियस तर गुरुवारी‎ सकाळी १३.६ अंश सेल्सियस‎ तापमानाची नोंद झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...