आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना बाधित:कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ; तयारीचे निर्देश ; मुंबई, दिल्लीसह राज्यातील विविध भागात कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, दिल्लीसह राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला तयारी संदर्भातील निर्देश दिले. गेल्या काही दविसांपासून ववििध भागांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षात्मक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली तरी सार्वजनिक ठिकाणी वाढलेली गर्दी, सुरक्षित अंतर, मास्कच्या वापराकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता जिल्ह्यात रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड नियंत्रणात असला तरी जिल्ह्याला कोरोना मुक्त ठेवण्यास अंतर राखणे मास्क वापर गरजेचा आहे. हर घर दस्तक मोहिम ः राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळत असतानाच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात हर घर दस्तक मोहीम राबवून लसीकरण वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. जिथे लसीकरण कमी आहे तिथे ही मोहीम राबवली जाईल.जिल्ह्यात १५ लाख ८९४४० लसीकरणाचे लाभार्थी आहेत. त्यापैकी १२ लाख १८,१९० लाभार्थ्यांनी कोविड विरोधी लसीचा पहिला डोस घेतला. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख २८ ९७६ आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिला,दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ५२. १६ टक्के झाली. यात १२ ते १४, १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील लसीकरणाचे उद्दिष्ट वाढीसह ज्यांनी पहिला डोस घेतला नाही असे लाभार्थी व दुसऱ्या डोसपासून वंचित लाभार्थ्यांसाठी हर घर दस्तक मोहीम राबवणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू केली असून, आठ दविसांनंतर जिल्ह्यांत ही मोहीम राबवली जाईल.

बातम्या आणखी आहेत...