आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग वाढत आहे. बाधित रुग्ण हे जिल्ह्याच्या विविध भागातील आहेत त्यामुळे संसर्ग वाढीचा धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकडे अद्यापही लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. आरोग्य विभागाच्या माहिती नुसार दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या पण डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या साडेतीन लाखांहून अधिक आहे.
कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मे महिन्याच्या अखेर अकोला शहरात दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर जून महिन्यातील ८ तारखेपासून जिल्ह्यात सलग रुग्ण आढळत आहेत. अवघ्या नऊ दिवसात जिल्ह्याच्या विविध भागात तब्बल २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यःस्थितीत २६ रुग्ण सक्रिय असून त्यातील ८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान दररोज वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित खबरदारी बाळगणे व लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
दिवसाला सरासरी ६५० ते ७५० डोस
जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी लसीकरणाचा वेग ढिम्म असल्याचे दिसून येते. दिवसाला सरासरी ६५० ते ७५० डोसेस दिले जात आहेत.
केंद्रांची संख्या दुप्पट होणार
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत २५ लसीकरण केंद्र विविध भागात सुरू आहेत. एक ते दोन दिवसात ही केंद्रे ५० पर्यंत वाढवण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.