आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापांचा संचार:अकोला शहरासह जिल्हा परिसरामध्ये वाढला सापांचा संचार

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाल्याने नागरी वसाहतींमध्ये सापांचा संचार वाढला आहे. मलकापूर, खडकी, एमआयडीसी परिसर, डाबकी, उमरी आदी विविध भागात दरवर्षीच्या पावसाळ्यात सापांचा संचार निदर्शनास येतो. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, अडचणीच्या ठिकाणी वावरताना, शेतात, गोठ्यात काम करताना सुरक्षितता बाळगावी, रात्री बॅटरी घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात नाग, घोणस, धामण, पानदिवड, मण्यार, गवत्या आदी विविध प्रजातींचे साप आढळतात. अकोला मनपा क्षेत्रातील मोकळे भुखंड, पडक्या वास्तू, दगड विटांचे ढिगारे, वाढलेले गवत आदी भागात पावसाळ्यात सापांचा संचार आढळून येतो. याशिवाय शहरालगतच्या वसाहती व शेतशिवारांमध्येही सापांचा संचार दिसतो. पावसाळ्याच्या सुरुवातील सर्रासपणे सापांचा संचार वाढलेला असतो. त्यामुळे नागरिकांनी वावरताना खबरदारी घ्यावी. दरवर्षी शेतकरी, शेतमजूरांना सर्पदंशाच्या घटनांना सामोरे जावे लागते. परिणामी नागरिकांनी सतर्क राहावे.

ही घ्या खबरदारी { गवताळ भाग, अडचणीची ठिकाणी टाळावी { रात्री शेतात कामे करताना, पिकांना पाणी देताना लांब रबरी बुट वापरा { रात्री शेतातील काम किंवा बाहेर वावरताना बॅटरी अवश्य वापरावी. {सर्पदंश झालेल्या व्यक्तीस धीर द्यावा, त्याला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात पोहोचवावे. वाहने सावकाश चालवा पावसाळ्यात सापांसह खार, सरडे आणि छोटे पक्षी अन्नाच्या शोधात रस्त्यावर येतात. दरम्यान रहदारी मार्गावरील दुचाकी, चारचाकी वाहनांखाली येऊन अशा अनेक जिवांचा जीव जातो. त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने सावकाश चालवावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...