आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:बोरगाव मंजूतील उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन ; गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन

बोरगाव मंजू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सोनोने यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच ध्वजवंदन करण्यात आले.

वेदांत गावंडे याने स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्म्याच्या जीवनावर उत्कृष्ट भाषण दिले. तसेच कबीर इंगळे व रोहन तायडे यांनी देशभक्तीपर गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. जान्हवी मोर्डे, संस्कृती विल्हेकर व अन्य विद्यार्थ्यांना ज्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन क्रमांक पटकावले त्यांना प्राचार्य उज्ज्वला सोनोने, प्रशासकीय अधिकारी निता बोबडे, सुशांत बडगे तसेच अध्यक्षांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रशांत होनाळे यांनी केले. धनश्री खानापुरे, कृतिका धाडसे, प्रभू देशमुख, आस्था बाजड, आर्या जावरे, अर्पित, माही सोनटक्के, समीक्षा बोचरे यांनी गीतावर उत्तम असा सांस्कृतिक कलाकृती सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, प्रशांत होन्हाळे, विल्हेकर, शिक्षिका स्वाती जैन, प्रीती वाघमारे, मीना वानखडे, शारदा देशमुख, अश्विनी माहुलकर, कुमुद काटोले, सोनटक्के, दीपाली देशमुख, दुर्गा असलमोल, नेहा वानखडे, निवाने, पुजा भराटे, पूनम पवार, प्रेम दुर्वे, भूषण गवई उपस्थित होते. मोहिनी इंगळे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...