आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन:अकोला जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप, भर पावसात शाळांनी काढल्या प्रभातफेर्‍या

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी भर पावसातच विविध शाळांच्या प्रभात फेरी निघाल्या. शाळांमध्ये रांगोळ्या, सजावटी, ध्वजवंदन, देशभक्तीपर गीतगायन, मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रम पार पडले.

सकाळी 9 वाजून 5 मिनीटांनी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे ध्वजारोहण कार्यक्रम आहे. सकाळी 10 ते 11.30 वाजपर्यंत शास्त्रीय स्टेडियम, अकोला येथे सांस्कृतिक कार्यक्रम व पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्लॅश मॉब कार्यक्रम नियोजित आहे. पोलिस बॅण्ड पथक व संकल्प प्रतिष्‍ठान ढोलताशा पथकाद्वारा देशभक्तीपर गीतवादन कार्यक्रम. सकाळी 10 ते 11 वाजता शहरातील प्रमुख ठिकाणी अशोक वाटीका चौक, रेल्वे स्टेशन चौक, रतनलाल प्लॉट चौक, हुतात्मा चौक, सिव्हील लाईन चौक, भगतसिंग चौक, गांधी चौक या ठिकाणी एकता बॅण्ड पथकाव्दारे देशभक्तीपर गित वादन कार्यक्रम आहे. सायंकाळी सात वाजतापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूले नाटयगृह, अकोला येथे देशभक्तीपर गित गायन कार्यक्रम आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले आहे.

काल सायंकाळपासून पाऊस

रविवारी दुपारी जिल्ह्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली. बाळापूर आणि अकोला तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. काहीशा विश्रांतीनंतर सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली. सोमवारी पहाटेपर्यंत तुरळक सरी बरसत होत्या. सकाळी 9 च्या दरम्यान पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

सकाळचा विसर्ग अलर्ट

आज पहाटे 4.00 वाजता दगड पारवा प्रकल्पाची पाणी पातळी 317.00 मी. असुन 92.15 % जलाशय साठा झाला आहे. दगड पारवा प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सूचीनुसार प्रकल्पामध्ये 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 86.55% पाणीसाठा असणे निर्धारित आहे. 15 ऑगस्टला पहाटे 4.00 वाजता विद्रूपा नदीपात्रात प्रकल्पाचे द्वार क्रमांक एक आणि चार 2.50 सेंटीमीटर उघडण्यात आले आहे. त्याचा विसर्ग 4.10 क्युमेक्स आहे. तरी नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडू नये. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...