आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Information On Seed Production Method By Visiting The Dam; Students Of Sumitrabai Andhare Krishi Vidyalaya Guided The Farmers |marathi News

मार्गदर्शन:बांधावर जाऊन बीजोत्पादन पद्धतीची माहिती; सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

अकोला2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे), पातूर येथील अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी पल्लवी सदानंद राऊत आणि क्रितिका नारायण तिवारी यांनी ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीजोत्पादन पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना दिली.

आपण शेतात पेरणीसाठी वापरत असलेल्या बियाण्यांची उत्पादन क्षमता टिकून राहावी, यासाठी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसावी आणि पेरणीच्या वेळी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे देखील या दोन्ही विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. बीजोत्पादन करताना काय काळजी घेणे गरजेचे आहे.

याबद्दल मार्गदर्शन केले. ही माहिती देत असताना शेतकरी अनुप डेहनकर, नीलेश डेहनकर व म्हैसपूर गावातील इतर शेतकरी सुद्धा तिथे उपस्थित होते. तसेच विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. खरडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. टी. कव्हर, कार्यक्रम अधिकारी व विषयतज्ज्ञ प्रा. पी. ए. देशमुख, प्रा. आर. एस. कनोजे, प्रा. बी. एस. राऊत, प्रा. के. एम. वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...