आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Ingole Honored With Farmers Award By Governor; Award In The Presence Of The Minister Of State At A Ceremony Held In Nashik For An Experimental Farmer From Dhakli |marathi News

दिव्य मराठी विशेष:राज्यपालांच्या हस्ते शेतकरी पुरस्काराने इंगोलेंचा गौरव; धाकलीतील प्रयोगशील शेतकऱ्याला नाशिक येथे झालेल्या सोहळ्यात राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कार

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाकली येथील प्रयोगशील शेतकरी विनोद इंगोले यांचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सोमवारी नाशिक येथे झालेल्या सोहळ्यात गौरव करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उत्पादन शुल्क मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, यांची या वेळी उपस्थिती होती.

अकोला, वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर बार्शीटाकळी तालुक्‍यातील शेवटचे गाव असलेल्या धाकली परिसरात विनोद इंगोले यांची शेती आहे. अल्पभूधारक शेतकरी विनोद इंगोले यांनी शेतीलाच प्रयोगशाळा करीत नवनव्या पीकपद्धती, वाणांची लागवड, विपणन अशा बाबींवर भर दिला आहे. आरोग्याप्रती जनसामान्यांमध्ये जागरुकता वाढीस लागली आहे. त्याच्या परिणामी जैविक शेतमालाला देखील स्थानिक, राज्य, देश व जागतिक पातळीवर मागणी वाढीस लागली आहे. त्यामुळेच जैविक उत्पादनांच्या बाजारपेठेचा विस्तार लक्षात घेता विनोद इंगोले यांनी जैविक शेतमाल पिकवण्याकडे लक्ष्य केंद्रित केले. अल्पभूधारक असल्याने क्षेत्राच्या मर्यादा होत्या परिणामी त्यांनी करारावर शेती कसत या शेतीतही सेंद्रिय भाजीपाला उत्पादन केले. आता लवकरच सेंद्रिय शेतमालाच्या विक्रीसाठी त्यांच्याद्वारे दालन उघडले जाणार आहे. या दालनाच्या लोगोचे अनावरण कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते करण्यात आले. शेती क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. सोमवारी २ मे रोजी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात पुरस्कार वितरण सोहळा झाला. या वेळी राज्यातील १९८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून बार्शीटाकळी तालुक्यातील विनोद इंगोले यांचा समावेश होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी त्यांना केंद्र शासनाच्या अधिनस्त दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचा मानाचा नवप्रवर्तक शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यासोबतच विविध संस्थांनी देखील त्यांचा सन्मान केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ते संपर्क शेतकरी आहेत.

शेतीत जपली प्रयोगशीलता
शेतीला सिंचनाची सोय असावी, याकरीता त्यांनी वाशीम जिल्ह्यातील किनखेड लघु प्रकल्पापासून आपल्या शिवारापर्यंत तब्बल तीन किलोमीटरपर्यंत पाइपलाइन टाकली आहे. या माध्यमातून पीकांच्या पाण्याची सोय करीत त्यांनी उत्पादकता वाढीवर भर दिला आहे. शेतकऱ्यांनी जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक किंवा बहूपीकांचा पर्याय निवडावा, असा सल्ला ते देतात.

बातम्या आणखी आहेत...