आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा जलयुक्त व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून, यासाठी संघटनेने िनती आयाेगाशी सांमजस्य करारही केला आहे. जिल्हा पाणीदार हाेण्यासाठी संघटनेकडून विविध उपाय याेजना करण्यात येणार आहेत. देशाच्या विकासात जैन समाज आपले योगदान देतच आला असून, आता भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) माध्यमातून जिल्हा जलयुक्त करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी दिली आहे. शास्त्रीनगरातील जैन स्थानकांत झालेल्या सभेत सांखला यांनी अन्य संबधित माहितीही दिली. अकाेल्यासह देशातील १०० िजल्हे जलयुक्त करण्यात येणार आहेत. या वेळी त्यांनी संघटनेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. सभेला नवनियुक्त राज्य सचिव दीपक चोपडा, विभागीय अध्यक्ष संजय आंचलिया, प्रा. सुभाष गादीया, दिलीप जैन, चंद्रशेखर चोरडिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी किशोर बोथरा, प्रा. दिलीप डोणगावकर आणि प्रा. सुहास उदापूरकर यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष नंदकिशोर सांखला आणि सचिव दीपक चोपडा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘बीजेएस’चे जिल्हाध्यक्ष किशोर बोथरा, शहर सचिव संजीव जैन, विभागीय उपाध्यक्ष नरेश चौधरी, अमरिश पारेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. सुभाष गादीया यांनी केले. या वेळी दीपक चोपडा यांनी विचार व्यक्त केले. या वेळी ‘डीआरसीसीयु’चे नवनियुक्त सदस्य विमल जैन यांचा नंदकिशोर सांखला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीप इंदाने यांनी केले. आभार ममता जैन यांनी मानले. या वेळी किशोर बोथरा, अमरिश पारेख, डॉ. स्मिता शहा, ममता जैन, मंजुषा जैन, अस्मिता नांदेडकर, नरेश चौधरी , रमेश चौधरी, प्रा. दिलीप डोणगावकर, प्रा. सुहास उदापूरकर, प्रशांत कोठारी , प्रवीण कर्नावट, प्रविण कोठारी, शीतल शहा, विवेक कान्हेड, रवी जैन, महेश बोडखे, शीतल खाबिया, रमेश तोरावत, जितेंद्र बोरा, सुमित चौधरी , कोमल बलदोटा, रितेश खाबिया प्रामुख्याने उपस्थित होते.
गाळाचा उपसा; खोलीकरणाचे कार्य
जिल्ह्यात बीजेएसतर्फे गत पाच वर्षात जल संधारणाशी िनगडीत प्रचंड कार्य झाले. सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत गाळाचा उपसा, खोलीकरण करण्यात आले. अकाेला तालुक्यात तर चार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला हाेता. यात्ून ४० कोटी लिटर अतिरिक्त पाणी साठवण व झिरपण्याची क्षमता निर्माण झाली. २०१९ मध्ये तर संघटनेने ३५ पोकलेन आणि जेसीबी मशीन पुरवल्या होत्या. या मशीनद्वारे ७,६८० तास काम करण्यात आले. तालुक्यातील जवळपास २५ गावातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ झाला हाेता. यंदाही आता जलसंधारणाचे कार्य हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.