आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Initiative Of The Multilingual Brahmin Community; Identify The Conspiracy To Divide, Follow The Path Of Progress: Kulkarni |marathi News

परशुराम जयंती उत्सव:सर्वभाषिक ब्राह्मण समाजाचा पुढाकार; फूट पाडण्याचे षड॰यंत्र ओळखा, प्रगतीचा मार्ग धरा : कुळकर्णी

अकोट17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आज विविध तथाकथित विचारवंत, राजकीय कार्यकर्ते ठरवून एक अजेंडा राबवत आहेत. तो म्हणजे हिंदू धर्मावर टीका करून त्यामध्ये फूट पाडणे. आपण सर्वांनी हा धोका ओळखून समाज एकसंध राहिला पाहिजे, देश प्रगतीपथावर गेला पाहिजे, यासाठी हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे,’ असे आवाहन विचारवंत शिवराय कुळकर्णी यांनी केले.

स्थानिक सर्वभाषिक ब्राह्मण समाजाद्वारे आयोजित भगवान परशुराम जयंती उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अॅड. सुनिल वडाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर भानुदास ठाकर, डॉ. हरिप्रसाद मिश्रा, कन्हैय्यालाल जोशी, सुभाष आसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कुळकर्णी म्हणाले की, पूजा विधी सांगणारे सर्वच जातींमध्ये आहेत आणि ते उत्तमपणे काम करीत आहेत. पण हिंदू धर्माच्या रूढी, परंपरा, श्रद्धा व आस्थांवर प्रहार करण्यासाठी ब्राह्मण समाजवर टीका केली जाते, कारण ब्राम्हण सॉफ्ट टार्गेट आहे. हिंदुत्ववादी विचारवंत व महापुरुषांची हेटाळणी केली जाते. खालच्या पातळीवर येऊन टीका केली जाते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लायकी नसणारे बेधडक खोटे आरोप करून टीका करतात. हे मोठे षडयंत्र आहे, ते आपण ओळखून सर्व हिंदू समाज एक राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. अध्यक्ष अॅड. सुनील वडाळकर यांचे भाषण झाले. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थी,विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला.संचालन प्रिती देशपांडे यांनी केले, प्रास्तविक दीपक देव यांनी केले तर चेतन देवळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमापूर्वी भगवान परशुरामाच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली. त्यात नागरिक सहभागी झाले होते. या परशुराम जयंतीनिमित्त शोभयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...