आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नांना पाठबळ:विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे

बाळापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, त्यास योग्य दिशा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी शिक्षक व पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात पुढील प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे, ती शोधता आली पाहिजे. त्यातून योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे. वडिलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे, असे मत उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत, त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी करिअर विषयक मार्गदर्शन व्हावे, यासाठी लोहारा येथील हव्वाबाई एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी व तालुका मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त सहकार्याने ‘गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उरळचे ठाणेदार अनंत वडतकार, अ. भा. मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हाध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, संजय खांडेकर सारा देशमुख उपस्थित होते.

यावेळी २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. एमकॉमच्या परीक्षेत प्रथमश्रेणीत उत्तीर्ण पत्रकार उमेश जामोदे यांचा सुपुत्र शिवदास जामोदे , पत्रकारांनाही स्मृतीचिन्ह देऊन गौरवले. यावेळी रामदास वानखडे, रमेश ठाकरे, उमेश जामोदे, तालुकाध्यक्ष शाहबाज देशमुख, डॉ. रहेमान, अमोल जामोदे, उत्तम दाभाडे, दीपक रौंदळे, दीपचंद चव्हाण, सुधीर कांबेकर, अनिल गिऱ्हे, अनिल दंदी, शिवदास जामोदे, राजेंद्र थेटे, अमोल साबळे, संदीप भारसाकळे, गजानन सुरजुसे, अमोल ढोके, अतिक देशमुख उपस्थित होते. संचालन शेख. एजाज यांनी तर आभार प्रवीण ढोणे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...