आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:ओबीसींवर अन्याय; एम्पेरिकल‎ डेटा अचूकपणे संकलीत कर

अकोला‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्पित आयोगाकडून ओबीसींचा ‎ ‎ एम्पेरिकल डेटा संकलित करणे सुरू‎ आहे. मात्र ही माहिती अचूक पद्धतीने संकलित करण्यात यावी, अशी मागणी ‎करीत महात्मा फुले समता परिषद, व ओबीसी समाज संघटनेतर्फे‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ‎करण्यात आली.‎ समर्पित आयोगामार्फत ओ.बी.सी. ‎इम्पेरिकल डेटा तयार करण्याची प्रक्रिया ‎सुरू आहे. हे काम ज्या पद्धतीने सुरू‎ आहे ती पद्धत अतिशय चुकीची असून,‎ त्यामुळे ओबीसी समाजावर भविष्यात‎ प्रचंड अन्याय होण्याची शक्यता निर्माण‎ झालेली आहे, असा आरोप ओबीसी‎ नेत्यांकडून होत आहे.

परिणामी पुढील‎ अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे.‎ दरम्यान गुरुवारी जिल्हा महात्मा फुले‎ समता परिषद व ओबीसी समाज‎ संघटना आक्रमक पवित्रा घेतला.‎ समर्पित आयोगातर्फे ओबीसी‎ एम्पेरिकल डेटा संकलपद पद्धत‎ चुकीची असल्याचा आरोप करीत‎ संघटनेने िनदर्शने केली. निवासी‎ उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना‎ निवेदन देण्यात आले. या वेळी माजी‎ आमदार तथा उपाध्यक्ष महात्मा फुले‎ समता परिषद महाराष्ट्र प्रदेश तुकाराम‎ बिडकर, जिल्हाध्यक्ष सदाशिव शेळके,‎ मनीष हिवराळे, गजानन इंगळे, प्रा.‎ विजय उजवणे, श्रीराम पालकर,‎ गजानन म्हैसने, उमेश मसने, महिला‎ जिल्हाध्यक्ष माया इरतरकर, कल्पना‎ गवारगुरु, ज्योती भवाने, राजेश‎ जावकर, दीपमाला खाडे, सुष्मा कावरे,‎ रामदास खंडारे, बाळकृष्ण काळपांडे,‎ उत्तम म्हैसने आदी उपस्थित होते.‎

या होत्या मागण्या..‎ १) समर्पित आयोगाच्या वतीने चुकीच्या‎ पद्धतीने होणारे कामकाज थांबवा वे.‎ २) बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक,‎ अंगणवाडी सेविका, आशा‎ स्वयंसेविकांतर्फे ओबीसी समाज‎ योग्य-अचूक माहिती संकलित‎ करण्यात यावी. ही माहिती शासना‎ मार्फतच सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवा‎ वी. अन्यथा अ. भा. महात्मा फुले‎ समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र‎ स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.‎
अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना महात्मा फुले समता‎ परिषद आणि ओबीसी समाज संघटनेचे पदाधिकारी- कार्यकर्ते.‎

बातम्या आणखी आहेत...