आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मातृशक्तीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध शिंदे- फडणवीस सरकार कारवाई करेल,’ असा इशारा देऊन मातृशक्तीच्या पाठीशी भाजप महिला आघाडी खंबीरपणे उभी असेल. महिला पदाधिकाऱ्यांनी मातृशक्तींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचव्यात,’ असे आवाहन भाजप प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. भाजप महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
भाजप अकोला ग्रामीण व महानगर महिला आघाडीतर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुसुम भगत होत्या. समाजाला दिशादर्शकाचे कार्य मातृशक्ती करत असते. समाज व राष्ट्र निर्माण व परविाराच्या विकासात मातृशक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे संस्कृतीमध्ये मातृशक्ती पूजनीय असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेत मातृशक्तींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इतकेच नव्हे तर ५१ टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळवण्यात मातृशक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
समाजातील पीडित, वंचित महिलांच्या पाठीशी मातृशक्तीने खंबीरपणे उभे राहावे, अन्याय- अत्याचाराच्या विरोधात सदैव आपल्या पदाचा वापर करून समाजात योग्य स्थान प्राप्त करून देण्यासाठी मातृशक्तीने कार्यरत व्हावे. तसेच पक्ष संघटनेचा विस्तार करून आपल्या सामाजिक कामाने समाजातील सर्व घटकांना भाजपशी जोडण्याचे काम करावे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष असून, मातृशक्तीकडे महत्त्वाची जबाबदारी आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी घराेघरी संपर्क साधून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान द्या, असे आवाहन सुद्धा या वेळी चित्रा वाघ यांनी केले. या वेळी त्यांनी अनेक प्रसंग, घटनांचे वर्णन सांगून आपण २४ तास महिलांच्या प्रश्नासाठी उपलब्ध असल्याचे याप्रसंगी सांगितले.मेळाव्याचे सूत्रसंचालन रश्मी कायंदे, यांनी केले. चंदाताई शर्मा यांनी आभार मानले. या वेळी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.