आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:उद्याेगांना पाणी पुरवठ्यासाठी कापशी तलावाची पाहणी

अकाेला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापशी तलावातून एमआयडीसीतील उद्याेगांना पाणी पुरवठ्यासाठी शनिवारी आमदार, जिल्हाधिकारी व इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना तलास परिसरातील काटेरी झुडपे काढण्यासह स्वच्छता करण्याची सूचना केली. कापशी तलावातून यापूर्वी अकोलेकरांची तहान भागविण्यात येत हाेती. आताही या तलावातून एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा होऊ शकतो.

त्यादृष्टीने शनिवारी आमदार वसंत खंडेलवाल व जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी तलावाची पाहणी केली. त्यांच्यासाेबत इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, अश्विन लोहिया, आनंद खंडेलवाल उपस्थित होते. या दारम्यान त्यांना तलावाच्या बांधावर काटेरी व अन्य झाडे वाढलेली दिसली या झाडांच्या मुळांमुळे तलावाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

काटेरी झुडुपे तोडण्यासह तलाव परिसर स्वच्छ करणार असल्याचे आमदार खंडेलवाल यांनी सांगितले. तलावातील पाणी अकोल्यात आणल्यास मोठे उद्योग येथे येऊन तरुणांना राेजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

उद्याेग सचिवांसमाेर प्रस्ताव
गत महिन्यात उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे येथे आले होते. या वेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी एमआयडीसीतील लॉजीस्टिक पार्कचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला हाेता. चांगले उद्योग आणायचे असतील तर त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असायला हव्यात. उद्योगांसाठी भरपूर पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कापशी तलावाची मदत होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...