आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात यंदा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ७३ हजार ७४२ हेक्टर क्षेत्रावरील िपकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पिकांच्या हानीची वंचित बहुजन आघाडीचे नेते,जि.प. पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
जिल्ह्यात पुरामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांची हानी झाल्याने तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, आता पेरणीसाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने रस्ते उखडले असून, अनेक पूलाची दुर्दशा झाली आहे. पुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ,जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भाेजने, सभापती पंजाबराव वडाळ, सदस्या मीना बावणे ,मिराताई पाचपोर यांच्या महसूल अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांना मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी केली.
अहवालाची प्रतीक्षा
जिल्ह्यात यंदा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ७३ हजार ७४२ हेक्टर क्षेत्रावरील िपकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अहवाल २० जुलै राेजीच जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे. पावसामुळे १३१ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, एक घर पूर्णतः नुकसानग्रस्त झाले आहे. प्रशासनाकडून संयुक्त पंचनामे (कृषी, महसूल व जि.प.ची यंत्रणा) करणे, नुकसानीच्या नोंदी घेणे आदी कामे सुरु आहे. त्यामुळे संयुक्त अहवालाची प्रतीक्षा प्रशासन व शेतकऱ्यांना आहे. हा अहवाल शासानाला सादर झाल्यानंतरच मदतीचा मार्ग माेकळा हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.