आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:मॉडेल रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात तयार होणाऱ्या ५ मॉडेल रेल्वे स्टेशनमध्ये अकोला रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. याच कामाची पाहणी करण्यासाठी डीआएम एस. एस. केडिया यांनी गुरुवारी सकाळी अचानक दौरा केला. यावेळी त्यांनी संपूर्ण रेल्वे परिसराची पाहणी केली.

मॉडेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी हॉटेल्स, सुसज्ज प्रवासी बैठक व्यवस्था, अत्याधुनिक तंत्रज्ञान, लायटिंग, वायफाय, सुविधायुक्त पूल, लिफ्ट आदींचा समावेश असणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तंत्रज्ञान, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. हे पीपीटी मॉडेलवर जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन असणार आहे. रेल्वे स्टेशनला एअरपोर्ट डिझाईन देण्याचा मॉडल रेल्वे स्टेशनचा मूळ संकल्प आहे. अमरावती, खंडवा, नाशिक, भुसावळ येथे मॉडेल स्टेशन तयार करण्यात येत आहे. अमरावती, नाशिक व भुसावळचे काम भुसावळ विभागातून करण्यात येत आहे. त्यामुळे डीआरएम यांनी अकोला येथे कामाची पाहणी केली

बातम्या आणखी आहेत...