आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ शाळांना उन्हाळी सुटी‎:जूनच्या शेवटच्या‎ आठवड्यात शाळा सुरू करण्याचे‎ निर्देश

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक‎ शाळांना २०२३ या वर्षातील उन्हाळी‎ सुटी मंगळवार २ मेपासून सुरू‎ होणार असून, ती रविवार २५‎ जूनपर्यंत आहे. सर्वच प्राथमिक,‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा‎ या २६ जूनपासून सुरू होतील, असे‎ शिक्षण संचालक कृष्ण कुमार‎ पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे.‎ अमरावती जिल्ह्यात जून‎ महिन्यातही तापमान चांगलेच‎ असते. त्यामुळे जूनच्या शेवटच्या‎ आठवड्यात शाळा सुरू करण्याचे‎ निर्देश देण्यात आले आहेत.

एवढेच‎ नव्हे तर पहिली ते नववी व ११ वीचा‎ निकाल ३० एप्रिल रोजी किंवा‎ त्यानंतर लगेच सुटीच्या कालावधीत‎ घोषित करण्यात यावा, अशा‎ सूचनाही शिक्षण संचालकांनी‎ दिल्या आहेत.‎ त्याचप्रमाणे शाळांनी उन्हाळा व‎ दिवाळीच्या दीर्घ सुट्या कमी करून‎ त्याऐवजी गणेशोत्सव आणि नाताळ‎ प्रसंगी देण्याबाबत संबंधित‎ जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक‎ शिक्षणाधिकाऱ्यांनी आवश्यक‎ निर्देश द्यावेत. तसेच माध्यमिक‎ शाळा संहिता नियम ५२.२ नुसार‎ शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या‎ एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त‎ असणार नाहीत, याची दक्षता‎ शाळांनी घेण्याचेही निर्देश शिक्षण‎ संचालकांनी दिले आहेत.‎