आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकी चाेरींची चाेरी करणाऱ्या टाेळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, दाेघांना अटक केली आहे. पोलिसांनी 20 दुचाकी जप्त केल्या असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 6 लाख 85 हजार आहे. या दुचाकी चाेरी प्रकरणी अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दुचाकी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच दुचाकी घर किंवा बाजारपेठेतून वाहन लंपास हाेत आहेत. अनेकदा तर घराबाहेर साखळदंडाने बांधून ठेवलेली वाहनेही साखळी ताेडून चाेरीला गेली आहेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने दाेन आराेपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी केली. पोलिसांनी 20 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली.
यांनी केली कारवाई
दरम्यान, ही कारवाई पोेलिस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, पोलिस कर्मचारी दत्तात्रय ढोरे, श्रीकांत पातोंड, विशाल मोरे, रवींद्र पालीवाल, विजय कबले, इमरान अली, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोने यांनी केली.
अशी मिळाली माहिती
अकोला येथे राहणारा सुरेश रामभाऊ खरबडकर (वय 30 वर्ष) अकोलासह, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर व अन्य जिल्ह्यात मोटर सायकली चोरी केली आहे, अशी माहिली पोलिसांना मिळाली. केलेल्या कारवाईनुसार पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. मात्र त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतू पोलिसांनी नत्याची कसून चाैकशी केल्यानंतर चाेरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला.
आरोपीचा मित्र सिद्धांत महेंद्र सुरडकर (रा. म. फुले नगर, सिंधी कॅम्प, अकोला) यानेही त्याला मदत केली. पोलिलांनी आराेपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे. पुढील कार्यवाहीसाठी आराेपींना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
येथे आहेत गुन्हे दाखल
दुचाकी चाेरीचे अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. यात अकाेला जिल्ह्यातील खदान, सिटी कोतवाली सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूरसह खामगाव शहर, मंगरूळपीर, दर्यापूर पोलिस स्टेशनअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील 16 मोटर सायकलींचा समावेश आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.