आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बार्शीटाकळीत सर्वधर्मसमभाव कार्यक्रम; पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम

बार्शीटाकळी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून सर्वधर्म समभाव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथील प्रभू पार्वती मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, तहसीलदार गजानन हामंद, पोलिस निरीक्षक संजय सोळंके, नायब तहसीलदार शविहरी थोंबे, अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, तुळशिराम बोबडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला सर्व धर्मांचे धर्म गुरु, पोलिस स्टेशनचे कर्मचारी, तथा नागरिक सहभागी झाले होते. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सामुदायिक प्रार्थना घेतली. त्यानंतर सर्व धर्म सद्भावना संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी येणारे सण उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत शांतता समिती सदस्य, पोलिस पाटील व नागरिकांना अवाहन केले. शहर हे शांतताप्रिय असून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून सर्व जाती धर्माचे नागरिक एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन उत्सव साजरे करतात, असे तुळशीराम बोबडे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार गजानन हामंद यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी खालीद बनि वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्थेचे उपाअध्यक्ष शाहदि इक्बाल खान व ज्येष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल यांनी अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. यावेळी अन्सार उल्ला खान, कुद्दुस उल्ला खान, माहेफुज उल्ला खान, भोला इनामदार, इरफान शेख, वकार उल्लाह खान, दत्ता साबडे, अशोक रत्नपारखी, देवदिास कावरे, पुष्पाताई रत्नपारखी, अलका जाधव, प्रभाकर चव्हाण आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील पोलिस पाटील, शांतता समिती सदस्य, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन अनंत केदारे, पोलिस गोपनीय विभाग प्रमुख किशोर पिंजरकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...