आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘योग्य पद्धतीने नियमित योगाभ्यास केल्यास शारीरिक, मानसिक विकार दूर होऊन सुदृढ निरोगी आयुष्य जगता येते. त्यामुळे निरोगी सुदृढ दीर्घायुष्यासाठी योग करावा,’ असे आवाहन योगशिक्षक चंद्रकांत अवचार यांनी केले. मंगळवारी २१ जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत त्यांनी योगाचे महत्व सांगितले. अभ्यासकांच्या मते २१ जून हा दिवस जगातील काही देशात वर्षांतील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवशी उत्तरायण संपूर्ण होऊन, दक्षिणायान सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो म्हणून या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले. याप्रमाणेच योगसुद्धा व्यक्तीला दीर्घ आयुष्य देण्याचे कार्य करते. योग हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. परंतु अलिकडे अगदी योगगुरू, योगशिक्षक, माध्यमांनी योग, प्राणायामाच्या महत्त्वाला लोकांपर्यंत नेण्याचे काम केले. त्यामुळे कोविड काळापासून अनेकजण नियमित योगाभ्यास करण्याकडे वळले आहेत.
हे आहेत योगाचे फायदे योगाभ्यास केल्याने अनेक असाध्य विकार दूर होऊन मन प्रसन्न व प्रफुल्लीत राहते. दमा, अस्थमा, रक्तदाब, मधुमेह, स्थुलपणावर नियंत्रण मिळवता येते. मान व कमरेचे विकार, मायग्रेन, ताणतणावावर नियंत्रण मिळविता येते. योगामुळे स्नायु मजबूत बनतात, रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्वचा, केस चकमदार बनतात, निरोगी सुदृढ दीर्घायुष्य लाभते. शरीरातील ऑक्सिजन पातळी राखली जाते. रोगप्रतिकारशक्ती व मेंदूची कार्यक्षमता वाढते. मनातील भीती दूर होते, मनोधैर्य व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. लाभासाठी नियमित योगाभ्यास हवा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.