आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन:श्री आरएलटी विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री आरएलटी विज्ञान महाविद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय नानोटी होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शा. शि. संचालक डॉ. राजेश चंद्रवंशी, डॉ. कांचन लाठी, डॉ. रश्मी जोशी सावलकर होते. योगासनाचे प्रात्यक्षिक विद्यार्थीनी वेदांती कोकाटे हिने सादर केले. तर प्रत्येक योगासनांचा वैज्ञानिक दृष्टीकोन तज्ञ डॉ. राजेश चंद्रवंशी यांनी विषद केला. कार्यक्रमामध्ये एकूण १५ विविध योगासनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांव्यतिरिक्त प्रा. डॉ. हरिष मालपाणी, डॉ. सुजाता ताडम, डॉ. अर्चना सावरकर, प्रा. वैशाली बडगुजर, प्रा. राम चव्हाण, प्रा. राम घायाळकर, प्रा. सोनाली गवांदे, कोकाटे, बाल योगा अभ्यासिका दिया मालपाणी यांच्यासह ५० अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रवंशी, डॉ. जोशी, डॉ. लाठी, डॉ. समाधान मुंडे, डॉ. रोहीत अग्रवाल यांचेसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.