आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अनियमित, दूषित पाणीपुरवठा; शविसेनेचे ठिय्या आंदोलन, अभियंत्यांची एक दविसाआड पुरवठ्याची ग्वाही

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा अनियमित व दूषित पुरवठा होत असल्याचा आरोप करीत शविसेनेने सोमवारी महापलिकेच्या जलप्रदाय विभागात ठिय्या आंदोलन केले. शविसैनिकांनी अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केली. अखेर एक दविसाआड पाणी पुरवठा करण्याची ग्वाही अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

जिल्ह्यात वातावरण दिवसेंदविस तापतच असून, नागरिकांना जादा पाण्याची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे शविसेनेने २ मे रोजी महापालिकेतील जलप्रदाय विभागात धाव घेतली. अनेक दिवसांपासून जुने शहरासह अन्य भागात अनियमितपणे पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत असल्याचे शविसेना नेत्यांचे म्हणणे होते. नागरिकांना पिवळ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी शविसैनिकांनी केली. या वेळी शविसेनेचे गटनेते तथा पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा,नगरसेविका मंजुषा शेळके, नितीन ताकवाले, युवा सेनेचे राहुल कराळे, शरद तुरकर, विजय परमार, अश्विन नवले, अभिषेक खरसान, रोशन राज, मनाेज बाविस्कर, सतिश देशमुख, नीलेश वानडखे, बबलू उके आदी उपस्थित होते. काय आहे आश्वासन पत्रात?

शविसैनिकांना जलप्रदाय विभागाने दिलेल्या लेखी आश्वासन पत्रात वेगवेगळ्या जलकुंभावरून होणाऱ्या पुरवठ्याची माहिती नमूद केली आहे ४-५ दविसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या नागरिकांना तो पुरवठा एक दिवसाआड होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ही प्रक्रिया ८ ते १० दिवसात होईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सत्ताधाऱ्यांवर टीका
शविसेनेने आयुक्तांना दिलेल्या पत्रात सत्ताधारी भाजपवर टीका केली. अमृत योजेनअंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली. त्यावेळी एक दविसाआड पाणी पुरवठा होईल, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र एक दिवसाआड पुरवठा तर होतच नाही; आठवड्यातून दोन वेळाही पाणी मिळत नाही. नागरिकांकडून ३६५ दिवसांचा कर वसूल केल्यानंतरही त्यांना सण-उत्सवांच्या दविसाताही पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यात येत नाही.

२) कमी दाबाने पुरवठा होत असल्याने अर्धा तास पाणी घरात पाेहोचण्यासाठी लागतो आणि ३० मिनीटांनी तर नळही बंद होतो. धरणात मुबलक पाणी साठा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला.

बातम्या आणखी आहेत...