आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शेतीमाल खरेदीत गैरप्रकार;‎ ‘वंचित’कडून निवेदन सादर‎

बार्शीटाकळी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी येथील खरेदी-विक्री‎ संघाच्या व्यवहारावर वारंवार‎ प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत,‎ त्याची चौकशी करण्यासाठी‎ बार्शीटाकळी तालुका वंचित बहुजन‎ आघाडी पार्टीचे ता. प्रसिद्धी प्रमुख‎ मिलींद करवते यांच्या नेतृत्वात‎ तहसीलदार आणि खरेदी विक्री‎ संघाचे सहाय्यक यांच्याकडे‎ ‘वंचित’कडून निवेदन सादर करण्यात‎ आले.‎ निवेदना नमुद असल्याप्रमाणे‎ बार्शीटाकळी येथे खरेदी-विक्री‎ संघाद्वारे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून‎ हरबरा, तूर इतर वाणांची खरेदी केली‎ जाते. शेतकऱ्यांकडून सर्व कागदपत्र‎ तपासले जातात. पण खरेदीची‎ पोहोचपावती दिली जात नाही.‎

शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित‎ ठेवले जाते. खरेदी-विक्री संघाचा हा‎ कारभार मनमानी युक्त आहे. याची‎ चौकशी करण्याचे आवाहन यावेळी‎ करण्यात आले.‎ प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते,‎ आनंद मते, गोबा शेठ, सलीम,‎ अनिल खंडारे, विश्वनाथ खंडारे,‎ गणेश, साहिल गवई, सुशांत वनारे,‎ दशरथ मते, रवींद्र खंडारे, सुनिल‎ टिकार, दिनकर वनारे, देविदास खडे,‎ धनंजय काकड उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...