आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभू श्रीराम यांनी वैभवसंपन्न घरामध्ये जन्म घेऊनही अत्यंत साधे जीवन व्यतीत केले. श्रेष्ठ मनुष्य जीवनाचा आदर्श त्यांनी घालून दिला. हल्ली आपण फक्त स्वत:चा विचार करतो. पण समाजसेवा, देशसेवा यात सहभागी होणे प्रत्येकांचे कर्तत्व आहे. आजच्या पिढीमध्ये देशाप्रती समर्पणाची भावना रूजवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अंजली पाटणकर यांनी केले. राष्ट्र सेविका समितीचा वर्षप्रतिप्रदा उत्सव रविवारी निवारा कॉलनी गौरक्षण रोड येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला. या वेळी समितीच्या अकोला जिल्हा शारीरिक प्रमुख अंजली पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अकोला नगर कार्यवाहिका वैशाली देशपांडे, कथ्थक नृत्य प्रशिक्षक अमृता जटाले-जोशी प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दंड प्रात्यक्षिकाने झाली. प्रास्ताविक वैशाली देशपांडे यांनी केले. आजच्या काळात महिलांचे मन आणि मनगट दोन्ही बळकट राहणे आवश्यक आहे. त्यासाठी समितीच्या वतीने विविध कार्य करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. अमृता जटाले यांनी समितीच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक केले. ओजस्विनी पांडे यांनी दंड प्रात्यक्षिक घेतले. स्वागत गीत दुर्वा कुलकर्णी, अमृत वचन प्रार्थना कुलकर्णी, पाहुण्यांचा परिचय सुरभी दोडके, पाहुण्यांचे स्वागत अनुजा गोंधळेकर व प्रणाली शास्त्री, सांघिक गीत शुचिता जोशी, वंदे मातरम गीत सीमा मुळे, सूत्रसंचालन वैशाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला अकोला जिल्हा कार्यवाहिका स्नेहा चिंचवडकर, चित्रा बापट, श्रद्धा मोकाशी, छाया मनोरकर, हेमा खपली, रश्मी कायंदे, सहकार्यवाहिका पुष्पा वानखडे, स्वाती जोशी यांच्यासह समितीच्या ज्येष्ठ सेविका, बालसेविका आणि परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.