आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘आई- वडील यांच्या सेवेसाठी धार्मिक ज्ञान असणे गरजेचे अाहे,’ असे प्रतिपादन मौलाना मोहम्मद उसामा (मुंबई) यांनी केले. स्थानिक मकतब (मदरसा) अबु हुरैरा आकोली बेस इदगाह येथे वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दारुल उलूम इल्यासिया मंगरुळपीरचे मौलाना मोहम्मद इस्माईल खान तर प्रमुख अतिथी म्हणून भरनी मस्जिद मुंबईचे इमाम व खतीब मुफ्ती शोएब खान, दाई इलल्लाह मौलाना मोहम्मद ऊसामा मुंबई हे होते. मदरसा मकतबमध्ये एकूण ८० विद्यार्थी- विद्यार्थिनी असून, वर्षभरात पूर्ण हजेरी लावणाऱ्या विद्यार्थी अब्दुल अनस अब्दुल जब्बारचा सायकल तर विद्यार्थिनी आशया सिद्धिका अब्दुल सादिकला शिलाई मशिन बक्षीस देण्यात आले.
नाझेरा कुराण पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थीनी डी नर सेट व पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या वेळी मदरसा (मकतब) अणू हेराच्या विद्यार्थ्यांना नात शरीफ, नाटक आदी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी इदगाह परिसरातील युवकांनी सहकार्य केले. संचालन मौलवी अब्दुल माजिद परतवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संचालक मौलाना मुनीर खान, हाजी जान जमदार, हाजी जूनैद, हाजी कबीर व हाजी जिया आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.