आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हितगूज:नवीन शैक्षणिक धोरणाबाबत‎ विद्यार्थ्यांची मते जाणून घेणे गरजेचे‎ ; प्राचार्य डॉ. देशमुख यांचे मत

नांदगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेठ‎ शासनाच्या शैक्षणिक धोरणाबाबत‎ विद्यार्थ्यांची मते जाणून घेणे अत्यंत‎ आवश्यक असून केवळ धोरणे‎ ठरवल्याने शैक्षणिक प्रगती होणार‎ नाही, तर त्यासाठी विद्यार्थ्यांची‎ मानसिकता देखील जाणून घेणे‎ गरजेचे असल्याचे मत प्राचार्य डॉ.‎ अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले.‎ येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला‎ महाविद्यालयाच्या रौप्य‎ महोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या‎ सभागृहात नुकतेच विदर्भस्तरीय‎ आंतरमहाविद्यालयीन वादविवाद‎ स्पर्धेचे आयोजन केले होते.‎ त्याप्रसंगी स्पर्धेला प्रमुख पाहुणे‎ म्हणून ते बोलत होते.‎ ‘शैक्षणिक धोरणांचे बदलते‎ स्वरूप विद्यार्थी हिताचे'' या विषयावर‎ महाविद्यालयाच्या वतीने वादविवाद‎ स्पर्धा आयोजित केली होती.

याप्रसंगी‎ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला‎ अध्यक्ष म्हणून स्व. दत्तात्रय पुसदकर‎ शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर‎ हिवसे तर प्रमुख पाहुणे म्हणून कला‎ व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हाचे‎ प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, भारतीय‎ महाविद्यालय अमरावती येथील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, संस्थेचे‎ सचिव श्रीकृष्ण बाळापुरे,‎ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.‎ डॉ. पी. आर. जाधव, स्पर्धेचे परीक्षक‎ कला व विज्ञान महाविद्यालय‎ कामरगाव जि. वाशीम येथील इंग्रजी‎ विभाग प्रमुख डॉ. दिनेश तट्टे, जि. प.‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,‎ कळमखार येथील शिक्षिका वैशाली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घवळे (गरकल) व भीम बारसे हे‎ उपस्थित होते.‎ प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांनी‎ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक‎ धोरणावर आपली अभ्यासपूर्ण मते‎ मांडण्याचा सल्ला दिला.

याप्रसंगी‎ प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व‎ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात‎ आला. उपस्थित सर्व पाहुण्यांनी व‎ अध्यक्षांनी सहभागी विद्यार्थ्यांना‎ शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व‎ पाहुण्यांचा परिचय प्रभारी प्राचार्य‎ डॉ. पी. आर. जाधव यांनी करून‎ दिला. विदर्भातील अनेक‎ महाविद्यालयातील दोन विद्यार्थी‎ अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने‎ आपापले मत मांडण्यास स्पर्धेत‎ सहभागी झाले होते. राष्ट्रीय‎ शैक्षणिक धोरण २०२० आणि‎ त्याचा शिक्षण क्षेत्रावर झालेला‎ सकारात्मक आणि नकारात्मक‎ परिणाम यावर विद्यार्थ्यांनी आपली‎ अभ्यासपूर्ण मते या स्पर्धेत‎ प्रभावीपणे मांडली. सूत्रसंचालन‎ इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पंकज‎ मोरे यांनी केले, तर आभार‎ ग्रंथपाल डॉ. विकास अडलोक‎ यांनी मानले.‎ स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाचे‎ अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रदीप‎ देशपांडे आणि प्रमुख पाहुणे म्हणून‎ ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे तसेच‎ स्व. दत्तात्रय पुसदकर शिक्षण‎ संस्थेचे सदस्य रेवण सोमेश्वर‎ पुसदकर आणि स्पर्धेचे तिन्ही‎ परीक्षक व महाविद्यालयाचे प्रभारी‎ प्राचार्य डॉ. जाधव उपस्थित होते.‎

स्पर्धेत या विद्यार्थ्यांना मिळाले पारितोषिक‎ स्पर्धेचे प्रथम वैयक्तिक पारितोषिक रोख व स्मृतिचिन्ह श्री शिवाजी कला‎ वाणिज्य महाविद्यालय अकोला येथील आदित्य टोळे, द्वितीय पारितोषिक‎ रोख तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र एसएसएमएम बीएड कॉलेज, नांदगाव‎ पेठ येथील वैष्णवी ठाकरे, तृतीयपारितोषिक रोख व स्मृतिचिन्ह ब्रिजलाल‎ बियाणी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी तुषार ठवकार यांनी‎ पटकावले. याचवेळी प्रोत्साहनपर बक्षीस रोख व स्मृतिचिन्ह यशवंतराव‎ चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी हिमांशू पाटीलने प्राप्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...