आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:भारताची अखंडता अबाधित‎ राखणे आपले नैतिक कर्तव्य‎;कौलखेड येथे  रामायण आणि अखंड भारत वर व्याख्यान‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राजक्ता विद्यालय व कनिष्ठ‎ महाविद्यालय कौलखेड येथे शारदीय नवरात्र व्याख्यानमालेच्या शेवटच्या‎ दिवशी समारोपीय पुष्प गुंतताना‎ ''रामायण आणि अखंड भारत'' या ‎विषयावर मातोश्री शिक्षण संस्थेचे‎ अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी ‎प्रकाशराव देशमुख यांनी रामायण‎ काळात श्रीरामाने आर्य व द्रविड‎ संस्कृतीला एकत्र करून अखंड भारत ‎निर्माण केला होता.

प्रत्येक संस्कृतीत‎ गुण-दोष असतात परंतु गुणांचे‎ अवलोकन करावे व दोष दूर करावे. त्या‎ संस्कृतीतील चांगल्या गोष्टी आत्मसात‎ केल्या तरच उत्तम जीवन जगता येईल.‎ असे सांगून भारताचे अखंडत्व अबाधित‎ राखणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे,‎ असे मत व्यक्त केले.‎‎जयश्री सोनटक्के यांनी स्वागत‎ गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.‎ अध्यक्षीय भाषणातून वनिता बदरखे‎ यांनी भारतीय संस्कृतीची जोपासना‎ केली पाहिजे व विद्यार्थ्यांमध्ये‎ सु-संस्काराची रुजवण केली पाहिजे,‎ असे मत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे‎ म्हणून प्रा. ज्योती देशमुख, स्वप्नगंधा‎ जगताप उपस्थित होत्या. प्रा. विठ्ठल‎ पवार व किरण खैरे यांनी पाहुण्यांचे‎ स्वागत केले. शैला डाबेराव यांनी‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा.‎ संजय गोळे यांनी सहा दिवसाच्या‎ कार्यक्रमाचा आढावा घेऊन आभार‎ मानले. या वेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक‎ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...