आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘निसर्गाचा समतोल न राखल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे अंत्यत गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा कारागृह अधीक्षक निर्मल यांनी केले.
शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने नेहरु पार्क येथे चिमणी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामप्रकाश मिश्रा होते. ते पुढे म्हणाले, योगगुरू मनोहरराव इंगळे यांनी घेतलेल्या बंदीवानांच्या कार्यशाळामुळे अनेक कैद्यांमध्ये आध्यात्मिक वृती वाढली आहे. निरनिराळ्या आध्यात्मिक पुस्तकांची मागणी वाढली आहे व ती योगगुरू पुरवत असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रास्ताविकात मनोहरराव इंगळे यांनी शिवतेज प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली व सर्व प्राणीमात्रावर प्रेम कराल, तरच भविष्य सुधारेल नाही तर निसर्गाचा अनियमितपणा वाढतच जाईल, असेही ते म्हणाले.
या वेळी जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी पाटील यांनी शिवतेज प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. पाणीपात्र वाटपाकरता स्व.उद्धवनाथ इंगळे, स्व. अरविंद देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, डॅा. गोविंद जाधव,अर्चना माने, विनोद भसीन, अनुराधा इंगळे यांनी मदत केली. कार्यक्रमास प्रामुख्याने जसवंतसिंग मल्ली, गजानन इंगळे, वामन चौधरी, रेवलनाथ जाधव, बाळासाहेब काळे, गुरमित गोसल, पुरूषोत्तम गुप्ता,शिवतेज इंगळे, डॅा.खराटे,देवकर, वाघमारे,सावरकर,कुंडलवार,राजेश मालविया,वंदना तायडे, सरला कागलीवाल,मिता खत्री, उज्वला उमाळे, खंडारे ताई, चौधरीताई,आशा जाधव, निर्मला काळे,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन उपसंचालक डॅा. गोविंद जाधव यांनी केले तर प्रा. सत्यनारायण बाहेती यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.