आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघगर्जना:पाऊस बरसला! ; मेघगर्जनेच्या साथीने... लखलखणाया विजांच्या साक्षीने...

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शनिवारी, ११ जूनला सायंकाळी ५. ४५ च्या दरम्यान विविध भागात मेघगर्जना, विजांचा लखलखाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अकोला तालुका व शहर परिसरात पावसाचा जोर अधिक होता. ठिकठिकाणी वादळी वारे वाहत होते. त्याचा वेग ताशी ४० ते ५० कि.मी. असल्याचे अंदाज कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी ९ जूनला रात्री झालेल्या वादळी पावसानंतर शनिवारी सायंकाळी पुन्हा जोरदार मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरुवात झाली. खरीपाच्या पेरण्यांसाठी या पावसाची प्रतीक्षा असली तरी जिल्ह्यातील फळबागांना वादळाचा फटका बसला. यापूर्वी तेल्हारा तालुक्यात केळी पिकांची नासाडी झाली. शनिवारीही वादळी पावसामुळे अनेक भागात नुकसान झाले. बोरगाव मंजू, मूर्तिजापुरात जोरदार बरसला ः मूर्तिजापूर तालुक्यातील विविध भागात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. राजनापूर परिसरातही वादळी पावसाचा जोर होता. दरम्यान अकोला शहरात सायंकाळी ५.४५ च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहत होता. सहानंतर पावसाचा जोर वाढल्याने नाले वाहते झाले. सुमारे सव्वातास पाऊस सुरु होता. ढगाळ वातावरण व पावसामुळे तापमानात घट झाली असून, शनिवारी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

०.५ मिलिमीटर ९ जूनला जिल्ह्यात सरासरी ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसाने उसंत घेतली. १० जूनला ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यातील ४.३ मिलिमीटर पाऊस हा तेल्हारा तालुक्यात नोंदवला.

पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांच्या मते अकोला जिल्ह्यात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. १२ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...