आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुकीची तक्रार:धनादेश अनादर प्रकरणी महिलेस कारावासाची शिक्षा ; साडेपाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनादेश अनादर प्रकरणी सुधीर कॉलनी येथील रहिवासी असलेल्या स्वाती अनुप आगरकर या महिलेस तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी साडे पाच लाखांचा दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सन २०१३ मध्ये सुधीर कॉलनी येथील रहिवासी स्वाती अनुप आगरकर या महिलेने अनुप डोडिया यांच्याकडून तीन लाख रूपये घेतले होते. या वेळी रकमेची परतफेड करण्याकरता धनादेश दिला होता. हा धनादेश फिर्यादीने वटवण्यासाठी खात्यात लावला असता रक्कम नसल्याने धनादेश अनादरीत झाला. या वेळी त्यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण दाखल केले. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून या प्रकरणात आरोपी स्वाती अनुप आगरकर यांना दोषी ठरवत साडे पाच लाख रुपये दंड भरण्याच्या सोबतच तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुद्धा या वेळी तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टाने सुनावली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या वतीने अॅड. सुशील व्ही. तलरेजा यांनी काम पाहिले.

फिर्यादीविरुद्ध आरोपीच्या पतीची फसवणुकीची तक्रार
याच प्रकरणातील आरोपी स्वाती आगरकर यांचे पती अनुप आगरकर यांनी फिर्यादी डोडिया यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे सुद्धा दाखल केले होते. त्यावर अनुप डोडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने हा एफआयआरच खोटा असल्याचा निर्वाळा देत गुन्ह्यातील सर्व आरोप फेटाळून लावत हा एफआयआर रद्द केला होता.

बातम्या आणखी आहेत...