आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंड फैजलवर एमपीडीए:1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध, टोळीने गुन्हे करणारे दोघे जिल्ह्यातून हद्दपार

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट फैल परिसरात राहणाऱ्या एका कुख्यात गुंडाविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव पारित करण्यात आला असून त्या आरोपीला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. तर दुसऱ्या कारवाईत टोळीने गुन्हे करणाऱ्या दोघांना पोलिसांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

फैजलवर हे आहेत गुन्हे

अकोट फैलातील पूरपीडित कॉर्टर येथे राहणारा आरोपी फैजल खान खलील खान (वय 25) याच्यावर यापूर्वी गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणे, चोरी करणे, खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल आहेत.

प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या

यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. मात्र तो त्या कारवायांना जुमानत नसल्याने अखेर त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्याचा एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

एक वर्षासाठी स्थानबद्ध

जिल्हादंडाधिकारी नीमा अरोरा यांनी कायदेशीर बाबीची पडताळणी करून कुख्यात आरोपी हा धोकादायक व्यक्त असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षाकरीता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश पारीत करण्यात आला.

दोघांना केले हद्दपार

टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश बसावा याकरीता अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार अरूण गुलाबराव घोडे (वय 56) व अजय अरूण घोडे (वय 24) या दोघांवरील गुन्ह्याची मालिका पाहता त्यांचे विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून 2 वर्षाकरीता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुशंगाने सोमवारी पोलिस अधीक्षकांनी दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...