आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:महागाईसह अन्य प्रश्नांवर काँग्रेसचे जेल भराे; रास्ता राेकाे आंदाेलन

अकाेला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई , बेरोजगार, अग्निपथ योजना व जीवनावशक्य वस्तू वरील लावलेल्या जीएसटी आिण केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने शुक्रवारी रस्त्यावर धाव घेतली. महानगरासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही आंदाेलन करण्यात आले. अकाेल्यातील मदनलाल धिंग्रा चाैकात (मध्यवर्ती बस स्थानक) रास्ता राेकाे करीत काँग्रेसने निदर्शने केली.

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सामान्य नागरिकांसह व्यापारीही आर्थिकदृष्टया अडचणीत आले. अशातच वाढत्या इंधनदरामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. खाद्य तेलाचे दरही वाढतच आहेत. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे माेडले आहे. दरम्यान ५ आॅगस्टला महागाईसह अन्य मुद्यांवर काँग्रेसने रस्त्यावर धाव घेत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबाेल केला. केंद्रातील मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला.

या आंदाेलनात महानगराध्यक्ष डाॅ. प्रशांत वानखडे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, डाॅ. झिशान हुसेन, माजी आमदार बबनराव चाैधरी, माजी विराेधी पक्ष नेते साजिद खान पठाण, कपिल रावदेव, प्रवक्ते डाॅ. सुधीर ढाेणे, मनीष हिवराळे, पुष्पा देशमुख, कशीश खान, विजय देशमुख,अॅड. सुरेश ढाकाेलकर,सागर कावरे, रवी शिंदे, आकाश कवडे, महेमूद खान, फजलू उर्र रहेमान, माे. इरफान यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

असे केले आंदाेलन: काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते दुपारी स्वराज्य भवन येथून निदर्शने करीत मध्यवर्ती बस स्थानकाजवळ धाव घेतली. या परिसरात फिरून आंदाेलकांनी निदर्शने केली. त्यानंतर रस्ता राेकाे आंदाेलनाला सुरूवात केली. त्यामुळे काही वेळ वाहतूक संथ झाली हाेती. सिटी काेतवाली पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेतले. काही वेळाने सुटका करण्यात आली.

बैठकीत लगावले एकमेकांना टाेले : आंदाेलनापूर्वी स्वराज्य भवन येथे कार्यकर्ते जमा हाेत असतानाच छाेटेखानी बैठक झाली. या बैठकीत नेत्यांंनी गर्दी जमा करण्यावरून नाव न घेता एकमेकांना टाेले लागवाले. आंदाेलनासाठी सातत्याने फोन करून बोलवावावे लागते, लज्जेची बाब आहे. आज काँग्रेसला कार्यकर्त्यांची गरज आहे. आंदाेलनासाठी येताना प्रत्येकाने किमान ५ ते ६ कार्यकर्त्यांना साेबत घेऊन यावे. प्रत्येकाने सध्या काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी कार्य करावे. पक्ष माझा आहे, या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. जिल्हयातील नेत्यांनी सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करावी. आंदोलनात सहभागी न हाेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्यात यावे, असेही नेते म्हणाले.

ग्रामीण भागातही आंदाेलन ; कार्यकर्त्यांनी दिल्या घाेषणा : कांॅग्रेसने महागाई, अग्नीपथ याेजना, जीवनावश्यक वस्तंूवर जीएसटी लावणे आदींच्या विराेधात ग्रामीण भागातही आंदाेलन करीत घाेषणा दिल्या. बार्शिटाकळी, बाळापूरसह अन्यत्र आंदाेलन केले. यावेळी आंदाेलकांनी भाजप,केंद्र सरकावर टीकास्त्र साेडले. आंदाेलनात जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी आमदार खतीब , जिल्हा उपाध्यक्ष संजय बोडखे, महेश गणगणे, भूषण गायकवाड, अतुल अमानकर, रमेश बेटकर, गणेशराव महल्ले, जितेंद्र गुल्हाने, प्रकाश वाकोडे, अफरोज पठाण, प्रशांत पाचडे, अनोख राहणे, निनाद मानकर, आलमगिर खान, स्वप्नील मोरे, मासूम खान, जकिर इनामदार, भारत बोबडे, बाळू ढोरे, दत्ता ढोरे, अजय टापरे, अनिस इकबाल, गोपाल ढोरे, नानासाहेब देशमुख, मनोहर दांडळे, हसन शहा, दिनेश दुबे, सोहेल शेख, राजेश गावंडे, राजेश नळकांडे, रमेश भगत सहभागी झाले हाेते.

महागाईचा सर्वाधिक फटका बसताे सामान्य नागरिकांना
वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका नागरिक गरीबांना बसत आहे. प्रत्येकाचे उत्पन्न कमी हाेत असून, खर्च मात्र वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यात आल्यानंतर तर सामन्यांचे कंबरडेच माेडले आहे. त्यामुळे आता जनतेमधूनच उठाव हाेत आहे. डाॅ. प्रशांत वानखडे, महानगराध्यक्ष काँग्रेस.

वैद्यकीय खर्चाचा भाररुग्णांसह नातेवाइकांवर
आराेग्य क्षेत्रात आयात करण्यासह वैद्यकीय उपकरणांवर जीएसटी लावण्यात आल्याने ते महाग झाले आहे. तसेच गाेळ्या-औषधींसाठीच्या कच्चा मालाचे भावही वाढले आहेत. परिणामी वैद्यकीय खर्चाचा भार रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. डाॅ. झिशान हुसेन,प्रदेश सचिव काँग्रेस, तथा माजी मनपा िवराेपी पक्ष नेते.

बेरोजगारी दूर करण्यासाठी उपाययाेजना कराव्यात
बेराेजगार तरुणांच्या हाताला काम हवे आहे. मात्र केंद्र सरकार तरुणांसाठी नवीन नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. परिणामी तरुणांचे भविष्य अंधारमय झाले आहे. सरकारने प्राधान्याने बेरोजगारी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. आकाश कवडे, जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...