आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विमिंगपूलमध्ये गोपाळकाला:जलतरणपूटंनी अनोख्या पद्धतीने साजरी केली दडीहंडी; तरुणांनी केला एकच जल्लोष

अकोला। करुणा भांडारकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दोन वर्षांनी सगळीकडे दंहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. यंदा मोठ्या उत्साहात राज्यभरात कृष्ण जन्मानंतर दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशातच अकोल्यामध्ये अनोखा दहीहांडी खेळ रंगला. जलतरणपटूंनी चक्क स्विमिंग पूलमध्ये दहीहंडी फोडून आनंद साजरा केला.

असे केले आयोजन

शहरातील वसंत देसाई क्रीडांगण येथील तरणतलावात दहीहंडी बांधण्यात आली. या जलतरण तलावात हौशी पोहणाऱ्या युवकांनी आणि मास्टर पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात गोविंदाचे तीन थर तयार केले. स्विमिंग पूलाच्या तळापासून 19 फूटावर दहीहंडी बांधण्यात आली. 8, 4, 3 आणि 1 अशा थरांमध्ये जलतरणपटूंनी एकमेकांच्या अंगावर चढून दहीहंडी फोडली. पाण्यामध्ये ओल्या अंगावर चढून दहीहंडी फोडणे कौशल्य होते. पण सर्वांनी ते लिलया पार पाडले. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या दहीहंडी सोहळ्या दरम्यान सर्वांमध्ये प्रचंड उत्साह होता. अनोख्या दहीहांडी सर्वत्र चर्चा आहे.

यांचा राहिला सहभाग

कार्यक्रम स्विमिंग क्लबचे संचालक गोपाल पाटील, मनोज पाटील, योगेश पाटील, कार्यालयीन सहकारी मोहिल खरात, ज्योती पनपालिया, तसेच प्रशिक्षक दिपक सदानशिव, विशाल पोहेकर , कोमल कदम, सतीश पांझाडे, प्रमोद खंडारे, दिनेश वाघ, अभी टाले, गौरव लोळ, निलेश साबळे, निलेश दूधगम कवसर, तसेच स्विमिंगच्या महिला विद्यार्थी व पुरुष यांचा मोठ्या संख्येत सहभाग राहीला. हा सोहळा पाहण्यासाठी स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे विद्यार्थी, पालक वर्गाने मोठी गर्दी केली होती.

व्यायामाचा दिला संदेश

निरोगी शरीर व मनासाठी व्यायाम आवश्यक असतो. आजच्या जीवनशैलीत प्रचंड तणाव आहे. यामुळे रोगांपासून मुक्त राहण्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. याच विचारातून ही संकल्पना पुढे आली. अनोख्या दहीहांडी कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांनी नियमित व्यायाम करण्याचा संदेश देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...