आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जनता भाजी बाजार आज बंद; जिल्हा कचेरीसमोर करणार धरणे आंदोलन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता भाजी बाजाराची जागा कायमस्वरुपी विद्यमान व्यावसायिकांना भाडे पट्ट्याने देण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, ७ ऑक्टोबरला जनता भाजी बाजार बंद ठेवला जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न महात्मा फुले जनता बाजार संघर्ष समिती करणार आहे.

शहरातील टॉवर चौकातील जुने बसस्थानक आणि जनता भाजी बाजाराची जागा मनपाने महसूल विभागाकडून ताब्यात घेतली. मनपाच्या रेकॉर्डनुसार ७६८ व्यावसायिक येथे कार्यरत आहेत. त्याच बरोबर अन्य ३५० असे एकूण १ हजार व्यावसायिक व्यवसाय करतात. मात्र आमच्याशी चर्चा न करता, कोणतीही माहिती न देता, मनपाने ही जागा ताब्यात घेतली.

त्यामुळे एक हजार कुटुंबाचा चरितार्थ कसा चालेल? हे व्यावसायिक रस्त्यावर येतील. त्यामुळेच ही जागा आम्हाला कायम भाडेपट्ट्यावर द्यावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ७ ऑक्टोबरला जनता भाजी बाजारातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवणार असल्याची माहिती सज्जाद हुसेन, प्रदीप वखारिया, पंकज मनियार, विजय तिवारी, तश्वर पटेल, पंकज शिवाल, नीलेश चिराणीया, जितेंद्र अग्रवाल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...