आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू व मेहुणीची कोयत्याने हत्या:वाशिम येथे संपत्तीसाठी जावयाने केली सासूसह मेहुणीची हत्या

वाशिम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपत्तीच्या वादातून सासू व मेहुणीची कोयत्याने हत्या केल्याची घटना मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे शुक्रवार, १३ मे रोजी घडली. सासू निर्मलाबाई भिकाजी पवार (६५ रा. शेलूबाजार) व मेहुणी विजया बबनराव गुंजावळे (४० रा. जिंतूर, जि. परभणी) अशी मृतांची नावे आहेत.

आरोपी जावई सचिन धर्मराज थोरात (रा. जनता वसाहत, पुणे) याचा सकाळच्या सुमारास सासू निर्मलाबाई भिकाजी पवार व मेहुणी विजया गुंजावळे यांच्याशी संपत्तीच्या कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेल्याने सचिन थोरातने सासू निर्मलाबाई आणि विजया यांच्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यामध्ये त्या दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

चालक व डॉक्टरांनी टाकले रुग्णांना रुग्णवाहिकेत: घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी परिसरात शुकशुकाट आणि स्मशान शांतता पसरली होती. त्यामुळे रुग्णवाहिका चालक राहुल खिल्लारे आणि डॉक्टर मिलिंद चव्हाण यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निर्मला पवार व विजया गुंजावळे यांना उचलून रुग्णवाहिकेत टाकत वाशीम येथे आणले. परंतु तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...