आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश उत्सव सार्वजनिक:सार्वजनिक मंडळाचा मान असलेले जोगेश्वर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत मनामनांमध्ये रुजवण्यासाठी टिळकांनी गणेश उत्सव सार्वजनिक स्तरावर साजरा करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशात नाही तर विदेशातही सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झाली. अकोल्यात टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जुने शहरात जोगेश्वर सार्वजनिक मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाला १०५ वर्षापेक्षा अधिक वर्ष झाले आहेत. अकोल्यातील तीन मानाच्या गणपतींमध्ये जोगेश्वर गणपतीचा समावेश आहे.

श्री जागेश्वर अंबिकस संस्थानद्वारे जाेगेश्वर मंडळाची स्थापना १९१८ साली करण्यात आली. मंडळाचे प्रथम अध्यक्ष रामचंद्र शांडिल्य होते. त्यांना माधव बांडी, भिकमचंद खंडेलवाल, हरिहर पुराडउपाध्ये, दादासाहेब गोखले यांची साथ लाभली. यानंतर विजय बांडी, प्रमोद गोखले, मनोज गावंडे-भौरदकर, योगेश शांडिल्य यांनी परंपरा पुढे नेली. सध्या मंडळाची धुरा अध्यक्ष गजानन रोकडे, मंगेश साळविकर, शशिकांत सापधारे, अविनाश कवडे, गोपाल चतुर्वेदी, उमेश रोकडे, मनीष पाथरकर, किशोर सुदालकर, भूषण अंबुलकर, प्रफुल्ल रोकडे, शशी कवडे, प्रतिक सापधारे, अंकित थोरवे, संकल्प नेरकर, दिलीप तायडे यांच्या खांद्यावर आहे.

मूर्तीचे वैशिष्ट्य असे : जोगेश्वर मंडळाची मूर्ती ४ फुटांची आहे. ही मूर्ती इंदूरच्या कारागिरांकडून तयार केली. पंच धातूपासून तयार या मूर्तीचे दहाही दिवस मनोभावे पूजन केले जाते. उत्सवप्रसंगी हजारो भक्त मानाच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. अकोल्यातील गणपतीच्या मिरवणुकीत बाराभाई, राजराजेश्वरनंतर जोगेश्वर मंडळाच्या गणपतीला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे.

संस्थेचे विविध उपक्रम
दरवर्षी जोगेश्वर मंडळाकडून गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. अन्नदान, रक्तदान उपक्रम आतापर्यंत मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले आहे. मंडळाने ७५ वर्षपूर्तीनिमित्त प्रसिद्ध ७५ मंदिरांच्या गणेश मूर्तींचा देखावा व त्यांचे पूजन केले होते. कोरोना काळात अन्नदान, आरोग्यविषयक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबवण्यात आले. यंदा मंडळाकडून नेत्रदानाविषयी व्यापक स्वरूपाची जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून नेत्रदान विषयी संकल्पपत्र भरून घेण्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...