आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे अहवाल सादर करण्याची मुदत शनिवारी संपली. मात्र कृषी, महसूल व ग्राम विकास विभाग (अर्थात जि.प. व पं.स.) या तीन यंत्रणांचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर झाला नाही. हा अहवाल ३० जुलैपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिला हाेता. अंतिम अहवाल विहित मुदतीत सादर न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई िमळण्यासाठी विलंब हाेत आहे. राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारच्या भाजपचे चार आमदार व एक खासदार आहे. तसेच शिंदे गटही आता सक्रिय झाला आहे. मात्र शेतकरी हवालदिल असतानाही सत्ताधारी भाजप पक्ष वाढीसाठी बैठकांमध्ये (भाजपने शुक्रवारी बैठक घेतली) व्यस्त आहे, तर शिंदे गटातील नेते शिवसेनेत स्वत:वर कसा अन्याय झाला, हे सांगण्यात धन्यता मानत आहेत.
जिल्ह्यात जून व जुलैत पुरामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पिकांची हानी झाल्याने तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र आता पेरणीसाठी पैसे कोठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने उर्वरित. पान ४
आतापर्यंत चाैघांचा मृत्यू; २२४ घरांचे नुकसान
जिल्ह्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत चार जणांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्यात २२२ घरांचे अंशत: तर दोन घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यात ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
पिकांची तालुकानिहाय झालेली हानी
अकाेला: अतिवृष्टीमुळे १६३ गावे बाधित झाली असून, साेयाबीन कापूस, तूर पिकांची हानी झाली. १९ जुलैपर्यंत ३६ हजार ४२८ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला. हा प्राथमिक अंदाज आहे.
मूर्तिजापूर: तालुक्यातील ८५ गावांतील ४६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले.
अकाेट: अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ४ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावरील साेयाबीन, कापूस, तूर पिकांची हानी झाली. ६४
गावे बाधित.
तेल्हारा: तालुक्यातील २७ गावांमधील २ हजार ६५० हेक्टर क्षेत्रातील िपकांचे नुकसान झाले.
बाळापूर: जिल्ह्यात सर्वाधिक बाळापूर ताालुक्यातील पिकांना पावसाचा फटका बसला असून, २८ हजार २७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. ४४१ हेक्टर क्षेत्रातील जमीन खरडून गेली आहे.
अधिकारी सुटीवर, कारभार प्रभारींवर अन् शेतकरी वाऱ्यावर
अकोला
जिल्ह्यात पावसाने नदी नाल्याकाठची शिवारं खरडली. शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाशी तोंड देत असतानाच नुकसानीचे सर्वे होऊन शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. मात्र खरीप हंगामातच कृषी विभागातील महत्त्वाच्या पदांचा प्रभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवला आहे. अशातच महिनाभरापासून जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत. त्यामुळे अधिकारी सुटीवर, कारभार प्रभारींवर आणि शेतकरी वाऱ्यावर अशी संतापजनक स्थिती निर्माण झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांचे महामंडळ, शेतकऱ्यांची संस्था अशी ओळख असलेल्या महाबीजची ओळख अलिकडे नाराज आयएएस अधिकाऱ्यांचा थांबा, अशी होताना दिसत आहे. महाबीजचे पूर्वीचे एमडी रुचेश जयवंशी (भाप्रसे) हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदलून गेल्याने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे सहसंचालक संतोष आळसे यांच्याकडे आला आहे.
यांचा पदभार त्यांच्यावर : अशी आहे सद्यःस्थिती
१) पालकमंत्री नाही : महिनाभरापासून जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत. त्यामुळे नवीन पालकमंत्र्याची नियुक्ती केव्हा होईल. प्रलंबित कामे कधी मार्गी लागणार याची प्रतीक्षा आहे.
२) महाबीजचे एमडी प्रभारी : महाबीजचे एमडीपद हे काही वर्षांपासून हे पद नाराज अधिकाऱ्याचा थांबा ठरत आहे. पूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांची साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोलाचे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.