आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांची शिक्षा:जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; घरात एकटी असल्याचा घेतला फायदा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल मंगळवारी (1 नोव्हेंबरला) दिला.

नक्की प्रकरण काय?

घटना बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होती. 24 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी साडेआठ वाजता मुलीचे वडील दळण आणण्यासाठी बाहेर गेले होते व तिचा भाऊसुद्धा घरी नव्हता. दरम्यान मुलगी ही घरामध्ये पाट्यावर मसाला वाटत असताना अश्विन जयेंद्र पांडे रा. धोतर्डी हा वाईट हे उद्देशाने घरात घुसला. त्याने मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडा ओरड केली आणि स्वत:ची सुटका करून घेतली. तितक्यात तिचे वडिलही घरी आले असता त्यांना पाहून आरोपी अश्विन हा पळून गेला. अशा फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध भादंविचे कलम 452, 354, बाल लैंगिक अत्याचाराचे कलम (पोक्सो) कलम 7,8 अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल

सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर आरोपीविरूद्ध अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाने आरोप सिद्ध होण्यासाठी सात साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला भादंविचे कलम 452 नुसार दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रूपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा, कलम 354 व बाल लैंगिक अत्याचाराचे कलम 7,8 नुसार दोषी ठरवून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल शाम खोटरे यांनी बाजू मांडली. एएसआय दीपक कंडारकर व सोनू आडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...