आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतभरात स्थापित विविध स्वरूपाचे ज्योतिर्लिंग हे सकारात्मक ऊर्जेची जागृतस्थाने असून, या भारतभरातील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सकल जन्माचे सार्थक होत अाहे, असा हितोपदेश शिवकथाकार विश्वेश्वरदास वैष्णव महाराज यांनी केले. कर्ता हनुमान मंडळातर्फे डाबकी रोड येथील कर्ता हनुमान मंदिरात सुरू असलेल्या विश्वेश्वरदास वैष्णव यांच्या शिवपुराण कथेत त्यांनी ज्योतिर्लिंगाची महिमा प्रतिपादित केली. ते म्हणाले, शिवपुराणामध्ये याचा ऊहापोह करण्यात आला आहे. ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज. ज्योती म्हणजे ज्ञान, ज्योती म्हणजे प्रेरणा, ज्योती म्हणजे चेतना होय. हे सर्व शक्तिरूप शिवाचे प्रतीक असून, तेच हे ज्योतिर्लिंग असून, ही एकूण बारा आहेत.
सोरटी सोमनाथ, श्रीशलि, महाकालेश्वर,ओंकारमां धता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढा नागनाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळमधील पशुपतिनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग असल्याचे त्यांनी या वेळी सांगून मानवाला प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंग असून, संस्कृती व एकात्मतेचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान कथा प्रांगणात सकाळी सामूहिक पारायण व दुपारी विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ उमरी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. आरतीत डॉ. अशोक ओळबे, सतीश ढगे, मंगला म्हैसने, मंडळाचे अध्यक्ष, माजी सैनिक सुभाष म्हैसने, अन्नपुरणेश पाटील, बुटोले, हरिभाऊ लाहोळे, शिवप्रकाश गावंडे, ज्ञानदेव बदरखे, सरपंच दत्ता ढोरे, भोजन यजमान संजय चिकटे, गोपाल उजाडे आदींनी सहभाग घेतला. ६ एप्रिलला हनुमान जन्मोत्सवावर महाप्रसाद समवेत कथेची भक्तिमय पूर्णाहुती होत असून, याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.