आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वशांती क्रीडा मंडळ व अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आगर येथे ३ मार्च रोजी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या सामन्यांना अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशनची मान्यता मिळाली असल्याने सर्व संघांनी या स्पर्धेला वेळेवर उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा. या स्पर्धा अकोला जिल्हा कबड्डी असो.
अकोलाचे सचिव आणि संघटनेचे पदाधिकारी, पंच यांच्या देखरेखीखाली व असोसिएशनच्या नियमानुसार खेळवण्यात येतील. तसेच हे सामने महात्मा फुले विद्यालय आगर येथे असून या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ३१००१ रुपये, द्वितीय बक्षीस २१००१ रुपये, तृतीय बक्षीस १५००१ रुपये व चौथे बक्षीस ११००१ रुपये देण्यात येणार आहे. तसेच प्रोत्साहन बक्षिसे सुध्दा ठेवली आहेत. या कबड्डी स्पर्धेच्या कबड्डी प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक, विश्वशांती क्रीडा मंडळ, हनुमान क्रीडा मंडळ व समस्त गावकरी यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.