आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला येत्या काही महिन्यात लागणाऱ्या अधिक पाण्याची गरज मनपाला कापशी तलावातून करता येणे शक्य आहे. येथील जलसाठ्यातून २० ते ३० हजार नागरिकांना वर्षभर पाणीपुरवठा होवू शकतो. नेहरु पार्क चौकातील बंद जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती केल्यास हे सहज शक्य आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मनपाची हद्दवाढ होवून सहा वर्ष होत आली. मात्र हद्दवाढ भागातील प्रत्येक भागात पाणी पुरवठा सुरु झालेला नाही. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधीचा निधी मिळणार आहे. या योजनेच्या डीपीआरमध्ये काटेपूर्णा व्यतिरिक्त पाण्याचे दुसरे स्त्रोत दाखवावे लागणार आहे. तूर्तास वान प्रकल्पातून पाणी आरक्षणास शेतकऱ्यांनी विरोध केला. तर जीगाव प्रकल्प पूर्ण होण्यास २० वर्ष लागू शकतात. त्यामुळेच एकेकाळी शहराची तहान भागवणाऱ्या कापशी तलावातून शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा होवू शकतो. कापशीतून १९२० ते १९८० पर्यंत पाणीपुरवठा झाला. काटेपूर्णा, कौलखेडा योजनेने या तलावाचा पाणी पुरवठा बंद केला.
तूर्तास काटेपूर्णातील आरक्षित २४ दलघमीची पूर्णपणेच नव्हे तर अधिक उचल केली जात आहे. हद्दवाढ भागात जिथे पाणी पुरवठा सुरु झाला नाही. मात्र तो सुरु झाल्या नंतर पाण्याची गरज भासणार आहे. ती कापशीतून पूर्ण होवू शकते. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
शहरात महापालिकेला येत्या काही महिन्यामध्ये अधिक पाण्याची गरज भासणार आहे. ही गरज कापशी येथील तलावातून काही अंशी पूर्ण होवू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास शहराला दररोज पाणी पुरवठा करताना मनपासमोर अडचणी येणार आहेत.
२० ते ३० हजार लोकांना होवू शकतो पाणी पुरवठा : गेल्या काही वर्षापासून कापशी तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे तलावातून दोन ते तीन दलघमी पाणी मिळू शकते. यातून २० ते ३० हजार नागरिकांना दरवर्षी पाणी पुरवठा केला जावू शकतो.
३ ते ४ कोटीत दुरुस्ती
नेहरु पार्क चौकात १२.५० एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. कौलखेडा योजना, कापशीच्या पाण्यावर या जल शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होत होती. मात्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.