आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भव्य कावड यात्रेची तयारी सुरू:20 किमी मार्गाचे पाहणी; कावड यात्रा मार्गावर भक्तांसाठी सोयीसुविधाची पूर्तता करा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला येथील आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भव्य जलाभिषेकासाठी मोठ्या संख्याने पालखी व भाविक सहभागी होतात. कावड यात्रा मार्गावर भाविकांची गैरसोय होणार नाही याकरीता सोईसुविधाची पूर्तता करा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.

नियोजन सभा संपन्न

कावड यात्रा नियोजनासंदर्भात आज प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आढावा घेवून कावड यात्रा मार्गाचे प्रत्यक्ष पाहणी केली. या बैठकीस प्रभारी अपर जिल्हा दंडाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, पोलिस निरिक्षक व्ही. आर. पाटील, सार्वजनिक पालखी व कावड महोत्सवचे अध्यक्ष राजेश भारती, शांतता समितीचे अध्यक्ष ॲड. पप्पु मोरवाल, उपाध्यक्ष पवन महल्ले, राजेश राऊत, तसेच अकोला व अकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी, मनपाचे अधिकारी, सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

20 किमी रस्त्याची पाहणी

कावड यात्रेबाबत भाविकांकडून झालेल्या मागण्यांनुसार उपाययोजना करण्याबाबत आज आढावा घेवून प्रत्यक्ष कावड मार्गावर पाहणी करण्यात आली. त्याअनुषंगाने गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पात्रात जिथून जलाभिषेकाचे पाणी घेतले जाते, त्या जागेवर सुरक्षा उपाययोजना, पुलावर सुरक्षा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, घाटावरील दुरुस्तीचे कामे, गर्दीच्या ठिकाणी कठळे बांधणी, तसेच गांधीग्राम ते अकोला या मार्गावर रस्ते दुरुस्ती, भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवणे याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी संबधित विभागाना निर्देश दिले.

आपातकालीन व्यवस्था

संबधित विभागाने समन्वय साधून कावड यात्रापुर्वी कामे तातडीने मार्गी लावावे. तसेच गांधीग्राम येथे आपातकालीन पथक व बोटची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले.

बातम्या आणखी आहेत...