आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार मंथन:पुन्हा-पुन्हा लिहीत राहा, आत्मपरीक्षण करा‎; ऐश्वर्य पाटेकर यांचे आवाहन

अकोला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुठलाही वाचक किंवा लेखक‎ याची स्वतंत्र अशी अभिरुची असते.‎ त्यामुळे कोणी काय वाचावे, हे‎ आपण कुणावर थोपवू शकत नाही.‎ त्याऐवजी‎ लिहिणाऱ्याने‎ चांगले लिहीत‎ जावे.‎ लिहिलेल्या ९९‎ कविता फाडून‎ टाकल्यानंतर‎ एक चांगली‎ कविता जन्माला येते. त्यामुळे‎ पुन्हा-पुन्हा लिहीत राहा, असे‎ आवाहन युवा साहित्य अकादमी‎ पुरस्कारप्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर‎ यांनी केले. साहित्य संमेलनात‎ दुपारच्या सत्रामध्ये युवा पिढी सध्या‎ काय वाचतेय ? या विषयावर‎ परिसंवाद झाला. या वेळी अध्यक्ष‎ म्हणून ते बोलत होते.‎ आजच्या साहित्याची अवस्था‎काय आहे, याचा उहापोह‎ करण्याची तसेच आत्मपरीक्षण‎ करण्याची गरज आहे.

त्यासाठीच‎ युवा साहित्य संमेलनाचे व्यासपीठ‎ आहे, असेही पाटेकर म्हणाले.‎ परिसंवादात बुलडाणा येथील मैत्री‎ नरेंद्र लांजेवार, अॅड. कोमल हरणे,‎ चंद्रकांत झटाले, नागपूरचे नितीन‎ नायगावकर आदींचा सहभाग होता.‎ डॉ. किरण वाघमारे यांनी‎ सूत्रसंचालन केले. तर आभार डॉ.‎ विनय दांदळे यांनी मानले. लेखकाने‎ लिखाण करताना शब्दांचे फुलोरे न‎ फुलवता साध्या भाषेत‎ सामान्यांसाठी लिहिले पाहिजे. ते‎ वाचले जाते. युवापिढीमध्ये सोशल‎‎ मीडियाचा प्रभाव अधिक आहे. येथे‎ उमटणारं साहित्य प्रकर्षाने वाचले‎ जाते.

या प्रभावाच्या काळात‎ लिहिणाऱ्याने गांभीर्य ओळखून‎ पोस्ट करायला हव्या, नवीन पिढीने‎ अभ्यासक्रमासह ज्ञानार्जनासाठीही‎ वाचत राहणे गरजेचे आहे, असे मत‎ चंद्रकांत झटाले यांनी व्यक्त केले.‎आपले आदर्श ठाऊक असणे‎ आवश्यक आहे. त्यासाठी चांगले‎ पुस्तके महत्त्वाचे ठरतात, असे अॅड.‎ हरणे म्हणाल्या. भयकथा,‎ रहस्यकथा आणि प्रेमकथा हल्ली‎ अधिक वाचल्या जात असल्याचे‎ निरीक्षण नोंदवत श्री. नायगावकर‎ यांनीही विस्तृत मत मांडले.‎

बातम्या आणखी आहेत...